By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 06, 2020 11:37 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 458 वर पोहोचली आहे. मुंबईतील वॉकहार्ट रुग्णालयातील 26 नर्स आणि 3 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेतर्फे वॉकहॉर्ट रुग्णालय आणि आजूबाजूचा परिसर हा ‘कंटेन्टमेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.मुंबई सेंट्रल या परिसरात वॉकहार्ट रुग्णालय आहे. या रुग्णालयात काम करणाऱ्या 26 नर्स आणि 3 डॉक्टरांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या रुग्णालयातून आतून बाहेर जाण्यास तसेच बाहेरुन रुग्णालयात जाण्यास मनाई करण्यात येत आहे. जोपर्यंत या रुग्णालयातील सर्व रुग्णांचा रिपोर्ट हा जोपर्यंत निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत हा परिसर ‘कंटेन्टमेंट झोन’ म्हणून घोषित केला आहे.या रुग्णालयातील 270 नर्से आणि काही रुग्णांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. ज्या नर्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले आहे.टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एक रुग्ण दाखल झाला होता. त्याला छातीत काही त्रास होत होता. त्यानंतर या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. हा रुग्ण चार दिवस रुग्णालयात होता. या रुग्णाच्या संसर्गाने या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 748 वर पोहोचली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील असून मुंबईसह उपनगरात 458 रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ पुण्यात 100 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.तर दुसरीकडे राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा हा 45 वर पोहोचला आहे. यातील सर्वाधिक 30 मृत्यू हे मुंबईतील असून 5 मृत्यू हे पुण्यातील आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे.
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी सध्या साधारण चार दिव....
अधिक वाचा