ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उन्नाव प्रकरणाचा निषेध करताना महिलेने आपल्या 6 वर्षांच्या मुलीवर 'पेट्रोल' ओतले आणि...

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 07, 2019 05:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उन्नाव प्रकरणाचा निषेध करताना महिलेने आपल्या 6 वर्षांच्या मुलीवर 'पेट्रोल' ओतले आणि...

शहर : देश

देशभर उन्नाव आणि हैदराबाद बलात्कार प्रकरणी रोष असताना दिल्लीत एक अजब घटना समोर आली आहे. येथील सफदरगंज रुग्णालयाबाहेर एका महिलेने उन्नाव बलात्काराचा निषेध करताना आपल्या 6 वर्षांच्या मुलीवर पेट्रोल ओतले. रुग्णालय परिसरात शनिवारी दुपारी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्नाव बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह रुग्णालयातून गावात नेण्यात आले. या घटनेच्या अवघ्या काही मिनिटांनंतर पीडितेला न्याय मिळवून द्या अशा घोषणा देत संबंधित महिलेने आंदोलन केले. सध्या तिला ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

मीडिया रिपोर्टनुसार, उन्ना बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह रुग्णवाहिकेतून गावात नेला जात होता. त्याच क्षणी संबंधित महिलेने "आम्हाला न्याय हवा" अशी घोषणाबाजी सुरू केली. तिने आपल्यासोबत आपली 6 वर्षांची मुलगी सुद्धा आणली होती. काही मिनिटांतच तिने आणलेला ज्वलनशील द्रव आपल्या मुलीच्या अंगावर ओतला. सुदैवाने, त्याच क्षणी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी महिलेला ऐनवेळी अडवून चिमुकलीचा जीव वाचवला आणि महिलेला ताब्यात घेतले.

काय म्हणाली महिला?

महिलेचे नाव अद्याप जारी करण्यात आलेले नाही. तिने सांगितल्याप्रमाणे, उन्नाव बलात्कार पीडितेवर झालेल्या अत्याचाराने तिला मानसिक धक्का बसला होता. त्यातच पीडितेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. यातूनच तिने निषेध व्यक्त करण्यासाठी इतके विचित्र आंदोलन केले. दरम्यान, महिलेने मुलीच्या अंगावर ओतलेला द्रव पेट्रोल किंवा ज्वलनशील पदार्थ किंवा इतर काय आहे याचा शोध घेतला जात आहे. सोबतच, या प्रकरणाचा तपास देखील सुरू आहे.

कोर्टात सुनावणीला जाताना पाडितेला जिवंत जाळले

उन्नाव येथील सामूहिक बलात्कार पिडितेचे दोन गुन्हेगार नुकतेच जामिनावर सुटले होते. या प्रकरणाची गुरुवारी (5 डिसेंबर) रोजी सुनावणी होती. याच सुनावणीसाठी पीडित कोर्टात जात होती. त्यावेळी जामिनावर सुटलेल्या नराधमांनी तिची वाट अडवून भर रस्त्यावर तिच्या अंगावर रॉकेल ओतले आणि जिवंत जाळले. पीडितेवर सुरुवातीला उत्तर प्रदेश आणि त्यानंतर दिल्लीतील रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतु, 90 टक्केपेक्षा जास्त भाजलेल्या तरुणीला वाचवता आले नाही.

मागे

कांदा आयातीच्या मुद्द्यावरून 'मराठा क्रांती मोर्चा'चा सरकारला थेट इशारा
कांदा आयातीच्या मुद्द्यावरून 'मराठा क्रांती मोर्चा'चा सरकारला थेट इशारा

'कांद्याचे भाव वाढले आहेत तर ओरड होत आहे. पण शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार य....

अधिक वाचा

पुढे  

जीएसटी करात मोठे बदल,जीवनावश्यक वस्तू महागणार?
जीएसटी करात मोठे बदल,जीवनावश्यक वस्तू महागणार?

केंद्र सरकार लवकरच आता जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल करणार असल्याची शक्यता ....

Read more