By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 14, 2019 05:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पूर्व द्रुतगती मार्ग आणि ऐरोलीला जोडणाऱ्या लिंक रोडवर खड्ड्यांमुळे आणखी एक बळी गेला आहे. टिळकनगरच्या ६३ वर्षांच्या शैला कदम यांचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे. शैला कदम २७ सप्टेंबरला मुलाच्या बाईकवरून ऐरोलीला मैत्रिणीकडे जात होत्या. मात्र खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांच्या मुलगा यतीन याची दुचाकी नियंत्रण सुटलं आणि शैला कदम या तोल जाऊन जमिनीवर पडल्या. यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना ऐरोलीच्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र त्या वाचू शकले नाहीत.
लग्न खरेदी करुन परतणाऱ्या डॉक्टर तरुणीचा बळी
ठाणे जिल्ह्यातल्या वाडा - भिवंडी रस्त्यावर मृत्यूचे तांडव पाहायला मिळत आहे. खड्ड्याने डॉक्टर तरूणीचा बळी घेतला. स्कूटी खड्ड्यात घसरल्यामुळे ट्रकखाली चिरडून या डॉक्टर तरूणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. नेहा आलमगीर शेख या २३ वर्षीय होत्या. नेहा आपल्या भावासोबत घरी परतत असताना त्यांची स्कूटी खड्ड्यात आदळली. त्यामुळे मागे बसलेल्या नेहा यांचा तोल गेला आणि त्याखाली पडल्या. मागून येणाऱ्या ट्रकने नेहाला चिरडले. नेहाचे पुढच्या महिन्यात लग्न असल्याने त्या ठाणे येथे लग्न खरेदीसाठी गेली असता घरी परतत असतांना अपघात त्यांचा बळी गेला.
अंधेरीत वीरा देसाई रोड परिसरात असलेल्या बहुमजली इमारतीला आग लागल्याने भीत....
अधिक वाचा