ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

300 किलोवरून थेट 86 किलो, सर्वाधिक वजनाच्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 12:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

300 किलोवरून थेट 86 किलो, सर्वाधिक वजनाच्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

शहर : virar

आशियातील सर्वाधिक 300 किलो वजनाच्या महिलेने आपले वजन 86 किलोपर्यंत कमी केले आहे. पालघर जिह्यातील अमिता राजानी (42) यांच्यावर मुंबईतील रुग्णालयातच बेरियाट्रिक सर्जरी करण्यात आली आहे. एवढया मोठया प्रमाणात वजन कमी होणे ही वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ बाब मानली जात आहे.
अमिता यांचे वजन वयाच्या सहाव्या वर्षापासून वाढण्यास सुरुवात झाली. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांचे वजन 126 किलो होते.
अमिता यांच्यावर चार वर्षांपूर्वी लिलावती रिसर्च सेंटर व हिंदुजा रुग्णालय-खार येथील बेरिऑट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा यांनी शस्त्रक्रिया केली. त्यांच्या शस्त्रक्रियेपूर्वी दोन महिन्यांची पूर्वतयारी करण्यात आली होती. त्यांच्यासाठी रुग्णवाहिकेचे दरवाजे काढले होते आणि एक साडेसहा फुटांचा सोफा रुग्णवाहिकेत बसकिण्यात आला. रुग्णालयामध्ये त्यांना विशिष्ट आहार घेण्यास सांगितला होता आणि त्यांच्यासाठी खास बेड, कपडे, वजन करण्याचे मशीन ठेवण्यात आले होते. त्यांची शस्त्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पडली. 2015 साली त्यांच्यावर पहिल्या टप्प्यातील लॅपरोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोनॉमी ही चयापचय शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांची परिस्थिती सुधारू लागली आणि त्यांचे बरेचसे कजन कमी झाले आणि त्या स्वतःहून चालू लागल्या. 2017 साली अमिता यांच्याकर दुसरी गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी त्यांचे कजन 140 किलो होते. त्यानंतर शारीरिक मेहनत आणि आहार संतुलनामुळे त्यांचे वजन कमी झाले. आपल्या दैनंदिन क्रियासुद्धा त्या व्यवस्थितपणे करू शकत नव्हत्या. देशविदेशातील एंडोक्रिनोलॉस्टस्नासुद्धा त्यांच्या स्थूलपणाचे नक्की कारण सापडत नव्हते.

 

मागे

‘हर-हर महादेव, बम बम भोले’च्या जयघोषात 6 महिन्यांनी उघडले केदारनाथ मंदिराचे दरवाजे
‘हर-हर महादेव, बम बम भोले’च्या जयघोषात 6 महिन्यांनी उघडले केदारनाथ मंदिराचे दरवाजे

डेहारडूनमधील केदारनाथ मंदिराचा दरवाजा सहा महिन्यांनी आज पहाटे उघडण्यात आ....

अधिक वाचा

पुढे  

मोदींच्या ‘त्या’ विधानाला श्रीनिवास प्रसादांचा भाजपाला घरचा अहेर
मोदींच्या ‘त्या’ विधानाला श्रीनिवास प्रसादांचा भाजपाला घरचा अहेर

तुमच्या वडिलांच्या पाठीराख्यांनी त्यांची ’मिस्टर क्लिन’ अशी प्रतिमा त....

Read more