ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट, आईसह दोन मुलांचा मृत्यू

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 11, 2020 05:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट, आईसह दोन मुलांचा मृत्यू

शहर : देश

तामिळनाडूमध्ये मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे आई आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना तामिळनाडूच्या करुरमध्ये घडली. या धक्कादायक घटनेमुळे तामिळनाडूमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुथूलक्ष्मी (29) असं मृत महिलेचे नाव आहे.

मुथूलक्ष्मी यांनी मोबाईल चार्जिंगला लावला होता आणि यावेळी त्या मोबाईलवरही बोलत होत्या. थोड्यावेळाने मोबाईल ठेवल्यानंतर अचानक त्यांच्या मोबाईलचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा मोठा होता की, यामध्ये मुथूलक्ष्मी यांच्यासह त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला.

स्फोट झाला तेव्हा त्यांच्या घरात मुथूलक्ष्मी यांच्यासह तीन वर्षीय रणजीत आणि दोन वर्षाचा दक्षितही होता. स्फोटामध्ये हे तिघेही गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर या तिघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

मुथूलक्ष्मीचे सहा वर्षांपूर्वी बाळकृष्णसोबत लग्न झाले होते. दोघे गेले काही वर्ष करुरमध्ये राहत होते. हे दोघेही जेवणाचे स्टॉल चालवतात. पण कर्ज वाढल्याने बाळकृष्ण याने कुटुंबाला सोडले होते. त्यानंतर मुथूलक्ष्मी एकटीच आपल्या कुटुंबाला सांभाळत होती. लॉकडाऊनमुळे तिच्या कमाईत घट झाली होती आणि कुटुंब आर्थिक संकटात सापडले होते.दरम्यान, या घटनेमुळे करुर गावात सर्वत्र शोकाकूल वातावरण आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास करुर पोलीस करत आहेत.

मागे

10 राज्यात 80% कोरोना रुग्ण, मोदींचा 10 मुख्यमंत्र्यांना सल्ला, 72 तासांच्या प्लॅनिंगवर भर
10 राज्यात 80% कोरोना रुग्ण, मोदींचा 10 मुख्यमंत्र्यांना सल्ला, 72 तासांच्या प्लॅनिंगवर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या देशातील 10 ....

अधिक वाचा

पुढे  

सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये उभारणार-: मुख्यमंत्री
सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये उभारणार-: मुख्यमंत्री

देशाच्या एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी 80 टक्के रुग्ण हे 10 राज्यांमध्ये आहेत. ....

Read more