By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 24, 2019 07:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
महाराष्ट्र सरकार आणखी एक चांगले पाऊल उचलले आहे. एसटीचे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती सोपविण्या आले आहे. आता पुरुषाप्रमाणे महिला चालक सुद्धा गाड्या चालवणार आहेत.
महामंडळाने जाहीर केलेल्या मेगाभरतीत 30% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या होत्या,त्यानुसार, 2406 पदावर महिलांची भरती होणार आहे. हलके वाहन चालवण्याचा एक वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही भरतीसाठी अर्ज करु शकतात. तसेच महिलांसाठी उंचीच्या अटींमध्ये राज्याने सवलत दिली आहे. निवड प्रक्रिया पूर्ण केलेल्या महिला उमेदवारांना एसटी महामंडळातर्फे अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. यागोदर महिलांची उंची 160 सेंमी उंच असलेल्या उमेदवारांना भरतीसाठी पात्र धरले जात होते. आता उंचीची मर्यादा किमान 153 सेमी केली असून,
आजपर्यंत 289 महिला उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी 163 महिला उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.विशेष म्हणजे निवड झालेल्या बहुतांश महिला उमेदवार या आदिवासी भागातील आहेत. देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते या पायलट प्रोजेक्टचे उद्घाटन करण्यात आले.
भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं शनिवारी दुपारी बारा वाजता दिल्लीत निध....
अधिक वाचा