ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 लागू होईपर्यंत निवडणूक लढणार नाही; महबूबा मुफ्तींची भीष्म प्रतिज्ञा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 23, 2020 08:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 लागू होईपर्यंत निवडणूक लढणार नाही; महबूबा मुफ्तींची भीष्म प्रतिज्ञा

शहर : देश

केंद्र सरकारने कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरची स्वायत्ता काढून घेतल्याने जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचा केंद्र सरकारवरील राग अजूनही गेलेला नाही. जोपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम लागू होत नाही आणि जम्मू-काश्मीरला स्वायत्ता बहाल केली जात नाही, तोपर्यंत कोणतीही निवडणूक लढणार नाही, अशी प्रतिज्ञाच महबूबा मुफ्ती यांनी दिली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरला स्वायत्ता मिळण्यासाठीचा मुफ्ती यांचा लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Won’t Fight Elections Till Article 370 Restored: Mehbooba Mufti)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना महबूबा मुफ्ती यांनी ही प्रतिज्ञा केली आहे. जोपर्यंत जम्मू-काश्मीरचं संविधान बहाल केलं जात नाही. जोपर्यंत राज्यात 370 कलम लागू होत नाही, तोपर्यंत मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असं त्या म्हणाल्या.

उद्या गुपकार आघाडीने विधानसभेची एकत्र निवडणूक लढवल्यास नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद निर्माण होणार नाही का? असा सवाल त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना मुफ्ती यांनी हे विधान केलं. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी एकमेकांचे राजकीय स्पर्धक आहेत. पण जम्मू-काश्मीरसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. शेवटी आम्ही काश्मीरी आहोत. आम्ही केवळ निवडणुकीचा विचार करत नाही. तर आमच्याकडून जे हिसकावून घेतलं गेलं आहे, त्यावर आम्ही बोलत आहोत. त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत, असंही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नाही

विधानसभा निवडणुका होतील तेव्हा आम्ही सर्वजण एकत्र बसू, चर्चा करू आणि निर्णय घेऊ. मी मात्र मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नाहीये, असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी त्यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांनी भाजपबरोबर केलेल्या युतीचं समर्थन केलं. माझ्या वडिलांनी राक्षसासोबत एक करार केला होता. काश्मीरच्या समस्या सोडवण्यासाठी माझ्या वडिलांनी मोदींसोबत हात मिळवला नाही. तर भारताच्या पंतप्रधानांशी हात मिळविला होता. माझ्या वडिलांनी आघाडी करून भाजपला सोबत घेण्याचा प्रयत्न केला. आमचा अजेंडा ठरलेला होता. तसेच आमच्या अटीवर आम्ही भाजपशी हातमिळवणी केली होती. त्यांनाही ते मान्य होते. पण सरकार पडल्यानंतर त्यांना जे हवं होतं तेच त्यांनी केलं, असं त्या म्हणाल्या.

मागे

विमानात एक कोरोनाबाधित आढळल्यास त्या रांगेतील सर्वच प्रवासी होणार क्वॉरंटाईन!
विमानात एक कोरोनाबाधित आढळल्यास त्या रांगेतील सर्वच प्रवासी होणार क्वॉरंटाईन!

कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्याने संपूर्ण देशात खबरदारीच्या उपाययोजना के....

अधिक वाचा

पुढे  

सावध राहा : कोरोना लस माहितीची चोरी, नकली लस बाजारात येण्याची भीती!
सावध राहा : कोरोना लस माहितीची चोरी, नकली लस बाजारात येण्याची भीती!

एक धक्कादायक बातमी लस (Corona vaccine) संदर्भातील. कोरोनाचा (Coronavirus) धोका जगभरात आहे. त्य....

Read more