By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 19, 2020 11:09 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी खासगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती ठेवावी. या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या कंपन्या व खासगी आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी सक्त तंबी मुंबई महापालिकेने बुधवारी दिली आहे.
कोरोना विषाणू मुंबईत झपाट्याने पसरत असल्याने पालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. गर्दीवर नियंत्रण राहण्यासाठी मॅाल्स, चित्रपटगृहे, नाट्यागृहे, जलतरणतलाव बंद करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर खासगी कंपन्यांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी यापूर्वीच दिले आहेत. मात्र, अजूनही मुंबईत कर्मचारी मोठ्या संख्येने कार्यालयात येत आहे. लोकल, बेस्टमध्ये नागरिकांची गर्दी अजूनही आहे. त्यामुळे बुधवारी पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी खासगी आस्थापनांची तपासणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. ५० टक्के पेक्षा जास्त उपस्थिती असेल त्या कंपनीवर कारवाई होईल.
आगामी पंधरवडा खूप महत्त्वाचा आहे. कोरोनाचे संक्रमण नियंत्रित ठेवण्यासाठी ....
अधिक वाचा