ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कामगारांप्रती संवेदना बाळगा अन्यथा...., कामगार आयुक्तांचे आदेश

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 21, 2020 11:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कामगारांप्रती संवेदना बाळगा अन्यथा...., कामगार आयुक्तांचे आदेश

शहर : मुंबई

कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. देशालाही याची झळ बसली असून पंतप्रधान मोदींनी गुरुवारी देशाला संबोधित करत २२ मार्चला जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. सकाळी ते रात्री वाजेपर्यंत घराच्या बाहेर पडण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केलं आहे. कोरोनामुळे कामावर प्रभाव झाला असल्यास त्यांचा पगार कापू नका असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या पार्श्वभुमीवर महत्वाचा निर्णय दिला आहे. कामगारांची पगारकपात करण्याबाबतचा आदेश त्यांनी आस्थापनांना दिला आहे. एक जाहीर पत्रक काढून त्यांनी ही माहिती दिली आहे.

सर्वांनी घरी राहण्याचे आवाहन सरकारने केले आहे. पण कामगारांना जबरदस्ती कामास बोलावण्याचे तसेच कामावर आल्यास पगार कापण्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभुमीवर कोणत्याही कामगारावर अशाप्रकारे पगार कपातीची अथवा कामावरुन काढून टाकण्याची कारवाई करु नये असे या आदेशात म्हटले आहे. यामुळे नोकरदार वर्गाची आर्थिक स्थिती तर ढासळेलच सोबत मानसिक स्थितीवर देखील परिणाम होईल.

त्यामुळे कामागारांना कामावरुन काढणाऱ्या तसेच पगार कापणाऱ्या आस्थापनांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा इशारा देखील यातून देण्यात आला आहे.

मागे

मुंबई, पुणे, नागपुरातील व्यवहार ठप्प, राज्यातील 10 शहरं लॉक डाऊन
मुंबई, पुणे, नागपुरातील व्यवहार ठप्प, राज्यातील 10 शहरं लॉक डाऊन

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यांसह जवळपास 10 शहरांचे व्यवहार आजपासून (21 मार्च) पुढ....

अधिक वाचा

पुढे  

राज्यात एका दिवसात 11 कोरोनाबाधित रुग्ण वाढले, आरोग्यमंत्र्यांची माहीती
राज्यात एका दिवसात 11 कोरोनाबाधित रुग्ण वाढले, आरोग्यमंत्र्यांची माहीती

राज्यात एका दिवसात 11 कोरोनाबाधित रुग्ण वाढले असून आजचा आकडा 63 वर गेल्याची मा....

Read more