By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 31, 2020 11:41 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
वुहान : चीनमध्ये 'कोरोना'मुळे २१३ नागरिकांचे बळी घेऊन जवळपास १० हजार जणांना या व्हायरसची लागण लागली आहे. कोरोना हा व्हायरस जीवघेणा विषाणू आहे. या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी जग सरसावले असून बळी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मनुष्यहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून (डब्ल्यू.एच.ओ.) जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणी घोषित केली आहे.
चीनच्या वुहान शहरातूनच कोरोना विषाणू जगभरात हळूहळू पसरत आहे. अनेक देशांमध्ये या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशातील नागरिकांना चीनमध्ये न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमणे चीनमधून येणार्या नागरिकांवर प्रवेशबंदी केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित आरोग्य संस्था असलेल्या डब्ल्यू.एच.ओ. सुरुवातीला कोरोनाचा धोका मोठा नसल्याचे सांगितले होते. पण मात्र, एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन डब्ल्यू.एच.ओ.ने आपली भूमिका बदलली आहे.
चीनमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्यांवर निर्बंध लादून हा व्हायरस रोखता येणार नाही. कारण, १५ पेक्षा अधिक देशांतील नागरिकांना या विषाणूची आधीच लागण झाली आहे. 'कोरोना'चा फैलाव रोखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. एकत्र येऊनच हे संकट थोपवले जाऊ शकते, असे "डब्ल्यू.एच.ओ" चे प्रमुख टेड्रॉस गेब्रेसस यांनी म्हटलं आहे.
आंबोली : आंबोली घाटात मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चालका....
अधिक वाचा