ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जगातील सर्वात कमी उंचीच्या व्यक्तीचे निधन 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 20, 2020 11:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30

जगातील सर्वात कमी उंचीच्या व्यक्तीचे निधन 

शहर : विदेश

       नेपाळ - जगातील सर्वात कमी उंचीचा व्यक्ती खगेंद्र थापाचे नुकतेच निधन झाले. निमोनिया या आजारामुळे थापाचे निधन झाले. जगातील सर्वात कमी उंचीचा व्यक्ती म्हणून 27 वर्षाच्या थापाला वर्ष 2010 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याची उंची 26.3 इंच होती. तसेच वजन 6 किलो होते.


     थापा नेपाळचा राहणार होता. खगेंद्र थापाचा जन्म 14 ऑक्टोबर 1992 रोजी काठमांडूपासून 200 किलोमीटरपासून लांब असलेल्या पोखरा येथे झाला होता.थापाला 2010 मध्ये 18 वर्षामध्ये जगातील सर्वात कमी उंचीचा व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले होते. एक वर्षानंतर थापाकडून फिलीपींसच्या जनरे बालाविंगने सर्वात कमी उंचीचा अवॉर्ड आपल्या नावावर करुन घेतला.


        “खगेंद्रची उंची एवढी कमी होती की जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा तो एका हातात सामावून जायचा”, असं त्याचे वडील रुप बहादूर यांनी सांगितले. खगेंद्रला निमोनिया झाला होता. त्यामुळे त्याला पोखराच्या मणिपाल रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मागे

उंब्रज-सेवा महामार्ग रोडवर भीषण आग : दुकान जळून खाक
उंब्रज-सेवा महामार्ग रोडवर भीषण आग : दुकान जळून खाक

         उंब्रज बस स्थानकाजवळ सेवा महामार्गालगत असलेल्या दुकानाला ....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई पोलीस दलात पुन्हा अश्वदलाचा समावेश होणार
मुंबई पोलीस दलात पुन्हा अश्वदलाचा समावेश होणार

        मुंबई - पोलीस दलात तब्बल ८८ वर्षांनी पुन्हा अश्वदलांचा समावे....

Read more