ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जगभरात कोरोनाचे १० लाखांवर रुग्ण, ५३ हजारांवर मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 03, 2020 12:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जगभरात कोरोनाचे १० लाखांवर रुग्ण, ५३ हजारांवर मृत्यू

शहर : विदेश

जगभरात कोरोनाचं संकट किती तीव्र झालं आहे हे नव्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १० लाखांवर गेली आहे. तर मृतांचा आकडा ५३ हजार २५८ इतका झाला आहे. एका दिवसात ७९ हजारावर रुग्ण वाढले आहेत.

एका दिवसात ५ हजार ९६८ बळी

दिवसेदिवस कोरोना व्हायरसमुळे मृतांची संख्या झपाट्यानं वाढत चालली आहे. आठवडाभरापूर्वी रोजचा मृतांचा आकडा अडीच हजारावर पोहचला होता. आठवडाभरानंतर हा आकडा दुप्पट होऊन आता तो सहा हजाराच्या जवळपास पोहचला आहे. सर्वाधिक मृतांची संख्या ही फ्रान्स आणि अमेरिकेत आहे. त्यानंतर इटली आणि स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत.

फ्रान्समध्ये एका दिवसात १३५५ जणांचा बळी

अमेरिकेत मृतांचा आकडा ६०८८ इतका झालाय. अमेरिकेत एका दिवसात ९६८ बळी गेले. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये मृतांचा आकडा अडीच हजारावर पोहचला आहे. गुरुवारी सर्वाधिक बळी फ्रान्समध्ये गेले आहेत. फ्रान्समध्ये एका दिवसात १३५५ जणांचा बळी गेला आहे आणि मृतांचा आकडा ५३८७ वर पोहचला आहे. इटलीमध्ये १३,९१५ जणांचा मृत्यू झालाय. स्पेनमध्ये १०,३४५ जण कोरोनामुळे दगावलेत.

फ्रान्समध्येही कोरोना मृतांची संख्या पाच हजारावर गेली असून आतापर्यंत ५,३८७ जणांचा बळी गेला आहे. ब्रिटनमध्ये २९२१, नेदरलॅन्डमध्ये १,३३९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जर्मनी आणि बेल्जियमनेही एक हजाराचा आकडा पार केला असून जर्मनीत ११०७ तर बेल्जियममध्ये १०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. चीनमध्ये ३३२२, इराणमध्ये ३१६० जण कोरोनामुळे दगावले आहेत.

मागे

पंतप्रधान मोदींच्या संदेशातील महत्त्वाचे मुद्दे
पंतप्रधान मोदींच्या संदेशातील महत्त्वाचे मुद्दे

कोरोना Coronavirus व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन....

अधिक वाचा

पुढे  

दोन दिवसात ६४७ कोरोना रुग्णांची वाढ, आरोग्य विभागाची माहिती
दोन दिवसात ६४७ कोरोना रुग्णांची वाढ, आरोग्य विभागाची माहिती

मागच्या दोन दिवसात ६४७ रुग्ण वाढल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दि....

Read more