By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 01, 2020 07:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे एक-दोन नव्हे तर तब्बल 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर, प्रशासनाने आणखी खबरदारी घेतली आहे. त्यामुळेच वरळी कोळीवाड्यातील काही रहिवाशांना पोदार हॉस्पिटलला हलवण्यात आलं आहे. वरळी कोळीवड्यात कोरोनाचे 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढल्याने, त्यांच्या संपर्कात आलेल्या 108 जणांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांनी काल रात्री 108 रहिवाशांची यादी तयार केली आहे. या सर्वांना नजीकच्या पोदार रुग्णालयात नेण्यात येणार आहे.
आज सकाळी 10 वाजता या सर्वांना पोदार रुग्णालयात हलवण्यात येणार होतं. पण त्या कारवाईला दुपारनंतर सुरुवात झाली. दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास एक बेस्ट बस वरळी कोळीवड्यात नेण्यात आली. त्या बसमधून टप्प्याटप्प्याने या रहिवाशांना नेलं जाणार आहे. पण काही रहिवाशी जाण्यासाठी तयार नव्हते. त्यावेळी पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांनी या रहिवाशांची समजूत काढली. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना आता यश आलं आहे.
कोळीवाड्यात कर्फ्यू
वरळी कोळीवाडा आणि आसपासच्या परिसरात एकूण 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून इथे कर्फ्यू लावण्यात आल्याने, नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव आहे.
आदर्शनगरमध्ये एका इमारतीतील एक दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. या दाम्पत्याला उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
मुंबईतील 147 ठिकाणं सील
बृहन्मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील 147 ठिकाणे सील करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच होम क्वारंटाईमधील नागरिकांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी खासगी इमारती आणि जहाजे ताब्यात घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.
मुंबईत आज (31 मार्च) कोरोनाचे नव्या 59 रुग्णांची नोंद झाली. तर सोमवारी 47 रुग्ण सापडले. या रुग्णांमध्ये 6 एप्रिलपर्यंत अशाचप्रकारे वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे झोपडपट्ट्या आणि चाळींमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळू लागले.
कोरोना विषाणूने जगभरात थैमान माजवला आहे. या विषाणूशी लढण्यासाठी देशातील सं....
अधिक वाचा