ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दहशतवादला प्रोत्साहन देणार्‍या यासिन मलिकला 'एनआयए'कडून अटक

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 02:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दहशतवादला प्रोत्साहन देणार्‍या  यासिन मलिकला 'एनआयए'कडून अटक

शहर : jammu

दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरविल्या  प्रकरणी (टेरर फंडिंग) राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जम्मू आणि काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला आज, 
बुधवारी अटक करण्यात आली आहे. त्याला दिल्ली न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला अटक केल्यानंतर त्याची कडक पोलिस बंदोबस्तामध्ये तिहार जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. 
मलिकच्या जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंटवर (जेकेएलएफ) केंद्र सरकारने गेल्या महिन्यात बंदी घातली आहे. त्याच्यावर सीबीआयने दोन खटलेही  दाखल करण्यात आले आहेत.
मलिकच्या चौकशीसाठी एनआयएच्या विशेष न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर त्याला दिल्लीत आणण्यात आले. मलिकला गेल्या महिन्यात अटक करून त्याची रवानगी जम्मू येथील  कोट बलवाल तुरुंगात करण्यात आली होती. 
आता त्याचा ताबा घेत एनआयएने त्याला अटक केली आहे. काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाला प्रोत्साहन  देण्याचे काम  यासिनच्या संघटनेकडून केले जात होते. केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद 
सईद यांची मुलगी रुबैय्या सईद यांचे अपहरण करणे आणि भारतीय हवाई दलाच्या ४ कर्मचाऱ्यांची हत्या केल्याचा आरोप मलिकवर करण्यात आला आहे.

 

मागे

राहुल गांधींनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भरला अर्ज
राहुल गांधींनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भरला अर्ज

उत्तर प्रदेशातील अमेठीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौथ्यांदा निव....

अधिक वाचा

पुढे  

मोदींनी राफेलमध्ये चोरी केली, केजरीवालांची टीका
मोदींनी राफेलमध्ये चोरी केली, केजरीवालांची टीका

सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला मोठा झटका दिला विरोधकांनीही मोदींना धारेव....

Read more