By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 31, 2020 01:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
येस बँकेने कर्ज थकवणाऱ्या अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचं (ADAG) मुंबईतील मुख्यालय असलेलं रिलायन्स सेंटर ताब्यात घेतलं आहे. अनिल अंबानी यांनी कर्ज न फेडल्याने बँकेने हा निर्णय घेतला. बुधवारी (29 जुलै) येस बँकेने फायनान्शिअल एक्सप्रेसमध्ये दिलेल्या एका जाहिरातीत सांगितलं, की “बँकेने सांताक्रूजमधील (मुंबई) 21,000 चौरस फूटपेक्षा अधिक क्षेत्रफळाची मुख्यालय इमारत आणि दक्षिण मुंबईमधील नागिन महलमधील दोन मजल्यांचा ताबा घेतला आहे.
रिलायन्स सेंटरचा सिक्युरिटायजेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल अॅसेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्टनुसार (SARFESI) 22 जुलैला ताबा घेण्यात आला. अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपने येस बँकेचं 2,892 कोटी रुपयांचं कर्ज न फेडल्याने बँकेने हे पाऊल उचललं आहे. या वर्षी मार्चमध्ये अनिल अंबानी यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, “येस बँकेच्या कर्जासाठी अंबानी ग्रुपने दिलेली हमी सुरक्षित आहे आणि सर्व कायदेशीर-आर्थिक गोष्टींचं पालन केलं जात आहे.”
अनिल अंबानी ग्रुपचा राणा कपूर, त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुली यांच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही संपर्क झालेला नाही. तसेच त्यांच्या प्रभावाखाली असलेल्या कोणत्याही संस्थेशी देखील काही संपर्कात नाही, असंही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं. मे महिन्यात अंमलबजावणी संचलनालयाने राणा कपूर, त्यांची मुलगी रोशनी कपूर, राधा कपूर आणि राखी कपूर यांच्या विरोधात येस बँक घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल झालं आहे. याशिवाय या आरोपपत्रात मॉर्गन क्रेडिट्स, येस कॅपिटलचंही नाव आहे. सध्या येस बँकेचे संचालक म्हणून प्रशांत कुमार काम पाहत आहेत.
अनिल अंबानी ग्रुपवर येस बँकेचं एकूण 12,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे. अनिल अंबानी 2008 मध्ये जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती होते. मात्र, टेलिकॉम, पॉवर आणि एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये झालेल्या मोठ्या तोट्यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढताच आहे.
गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ५५०७९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त....
अधिक वाचा