By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 15, 2020 11:22 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलण्यात आलं आहे. मोघल संग्रहालयाला आता छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असे नाव दिले गेले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबतची माहिती दिली आहे.या निर्णयाची माहिती मुख्यमंत्र्यांनी एका ट्विटमध्ये दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'आग्रामध्ये निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाईल. आपल्या नवीन उत्तर प्रदेशात गुलामगिरीच्या मानसिकतेच्या चिन्हांना स्थान नाही. आमचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहे. जय हिंद जय भारत.'
आगरा में निर्माणाधीन म्यूजियम को छत्रपति शिवाजी महाराज के नाम से जाना जाएगा।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) September 14, 2020
आपके नए उत्तर प्रदेश में गुलामी की मानसिकता के प्रतीक चिन्हों का कोई स्थान नहीं।
हम सबके नायक शिवाजी महाराज हैं।
जय हिन्द, जय भारत।
यापूर्वी योगी सरकारने राज्यातील ११ शहीद व्यक्तींचं नाव रस्त्यांना देण्याचा निर्णय घेतला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भातील अधिसूचना देखील जारी केली आहे. जय हिंद वीर पथ योजना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहीर केली. शहीदांच्या सन्मानार्थ या मार्गांवर मोठे आणि आकर्षक फलक लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी दिले होते.
गेल्या २४ तासांत देशभरात कोरोना व्हायरसच्या ८३,८०९ नव्या रुग्णांची नोंद झा....
अधिक वाचा