ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नाशकात चालतंफिरतं 'शहीद स्मारक', तरुणानं शरीरावर गोंदवली 559 शहिदांची नावं

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 18, 2020 09:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30

नाशकात चालतंफिरतं 'शहीद स्मारक', तरुणानं शरीरावर गोंदवली 559 शहिदांची नावं

शहर : नाशिक

देशासाठी शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाते. अमर रहेच्या घोषणा दिल्या जातात आणि नंतर हे शहीद विस्मरणात जातात. पण त्यांचं कायम स्मरण राहावं, यासाठी नाशकात एक चालतंफिरतं शहीद जवानांचं जीवंत स्मारक आकारलं आहे.

देशासाठी शहीद झालेल्या जवानावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होतात. भारत माता की जय अशा घोषणा देत शहिदाला अखेरचा निरोप दिला जातो. आणि मग पुढं...? अनेकदा त्यांचं साधं स्मारकही उभारलं जात नाही. पण याला अपवाद ठरलाय तो नाशिकचा तरुण. पंडित अभिषेक गौतम... या अभिषेकचं शरीर म्हणजे चालतं-फिरतं स्मारकच जणू... छातीवर, पाठीवर, हातांवर गोंदवून घेतलेले हे टॅटू म्हणजे अभिषेकच्या देशप्रेमाची प्रतिकं.

छत्रपती शिवाजी महाराज, झांशीची राणी, महाराणा प्रताप यांचे टॅटू त्यानं शरीरावर काढलेत. कारगिल युद्धात शहीद झालेल्या तब्बल 559 जवानांची नावं त्यानं शरीरावर गोंदवून घेतलीत.

शरीरावर टॅटू कोरणं, हे वाटतं तेवढं सोप्पं नाही. अभिषेकनं सलग अकरा दिवस, दररोज आठ तास आपलं शरीर गोंदवून घेतलं. त्यासाठी त्याला पेन कीलरही घ्याव्या लागल्या.

या शहीदांच्या घरी जाऊन त्यांच्या घरची माती देखील अभिषेक जमा करतोय.. त्याच्या या अनोख्या देशप्रेमाबद्दल कारगिल युद्धातले अपघातग्रस्त जवानही कृतज्ञता व्यक्त करत आहे.

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला लाऊड स्पीकरवरून 'जरा याद करो कुर्बानी' अशी गाणी लावून भागणार नाही. तर अभिषेकसारखं निस्सीम देशप्रेम तरुणांनी जपण्याची गरज आहे. तरच देशासाठी प्राण देणाऱ्यांचं बलिदान सार्थकी लागेल.

मागे

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, यांना लोकलची मुभा
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, यांना लोकलची मुभा

कोविड-१९च्या (Covid-19) पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवासासाठी (Railway travel) काही बंधने आजही ....

अधिक वाचा

पुढे  

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतपत्रिकांची हेराफेरी झाल्याचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतपत्रिकांची हेराफेरी झाल्याचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतपत्रिकांची हेराफेरी झाल्याचा गंभीर आरोप पदवी....

Read more