ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

१ ऑक्टोबर पासून ड्रायविंग लायसन्स आणि आरसीमध्ये होणार 'हा' बदल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 28, 2019 10:22 AM 2019-02-12T14:15:30+5:30

१ ऑक्टोबर पासून ड्रायविंग लायसन्स आणि आरसीमध्ये होणार 'हा' बदल

शहर : देश

नवा मोटर वाहन कायदा २०१९  नुसार कायदे आणि दंड अधिक कठोर करण्यात आले आहेत. ऑक्टोबर पासून हा कायदा लागू होणार असून त्याची चर्चा देशभरात सुरु आहे. पण तुमच्या गाडीचा परवाना आणि वाहन परवाना आणि रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट  देखील बदलणार आहे. ऑक्टोबर पासून ड्रायविंग लायसन्स आणि आरसी फॉर्मेटमध्ये बदल होणार आहे. या नव्या बदलानुसार वाहन चालकांचे ड्रायविंग लायसन्स आणि आरसी फॉर्मेट एकच असणार आहे. ड्रायविंग लायसन्स आणि आरसीचा रंग, डिझाइन, लुक आणि सुरक्षेचे फिचर्स एकसारखेच असणार आहेत.

नव्या नियमानुसार स्मार्ट ड्रायविंग लायसन्स आणि आरसीमध्ये मायक्रोचिप आणि क्यूआर कोड असणार आहे. राज्यामध्ये ड्रायविंग लायसन्स, आरसीचा रंग आणि प्रिंटींग एकसारखी असणार आहे. ड्रायविंग लायसन्स आणि आरसीची माहिती एकाच ठिकाणी मिळू शकणार आहे. आतापर्यंत प्रत्येक राज्याप्रमाणे हा फॉर्मेट बदलत होता. पण आता असे होणार नाही. क्यूआर कोड आणि चिपमध्ये सर्व रेकॉर्ड राहणार आहे.

ड्रायविंग लायसन्स आणि आरसी संदर्भात प्रत्येक राज्य वेगळा फॉर्मेट तयार करत आहेत. पण काही राज्यांत याच्या सुरुवातीला माहीती छापली आहे तर काहींनी मागच्या बाजूस छापली आहे. पण सरकारच्या नव्या निर्णयानंतर ही माहीती एकसारखी आणि एका जागीच राहणार आहे.

मागे

भारतीय सेनेच्या चीता हेलिकॉप्टरला अपघात, २ वैमानिकांचा मृत्यू
भारतीय सेनेच्या चीता हेलिकॉप्टरला अपघात, २ वैमानिकांचा मृत्यू

भूतानमध्ये भारतीय सेनेच्या चीता हॅलिकॉप्टरला शुक्रवारी अपघात झाला. दुपार....

अधिक वाचा

पुढे  

पाकिस्तान असा देश आहे जो दहशतवाद्यांना पेंशन देतो
पाकिस्तान असा देश आहे जो दहशतवाद्यांना पेंशन देतो

यूएनमध्ये पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांच्या भडकाऊ भाषणाला भारताच्या....

Read more