ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई विमानतळाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत 31 वर्षाच्या तरुणाची आत्महत्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 12, 2019 12:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई विमानतळाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत 31 वर्षाच्या तरुणाची आत्महत्या

शहर : मुंबई

31 वर्षाच्या तरुणाने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली आहे. शनिवारची ही घटना असून अक्षय सारस्वत असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण उत्तर प्रदेशातून आला होता आणि त्यावर मानसिक ताण होता म्हणूनच त्याने विमानतळावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. अक्षयचे मित्र आणि नातेवाईक यांच्याकडे तपास करत आहेत. 

आपल्या मृत्यूला कुणास जबाबदार धरू नये असे त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. ही चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्या तरुणाचे नातेवाईक मुंबईला पोहचले आहेत. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचा सर्व प्रकार विमानतळावरील काही प्रवाशांनी चित्रित केला आहे. हा तरुण इमारतीवर बराच वेळ लटकत होता मात्र त्यास वाचवण्यास कोणी पुढे येत नसल्याचे या चित्रीकरणातून दिसत आहे. 

मागे

पाकिस्तानातल्या पंचतारांकित हॉटेलवर तीन सशस्त्र दहशतवाद्यांचा हल्ला
पाकिस्तानातल्या पंचतारांकित हॉटेलवर तीन सशस्त्र दहशतवाद्यांचा हल्ला

पाकिस्तानतल्या हॉटेलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे पाकिस्तानातल्या ग्व....

अधिक वाचा

पुढे  

दादर येथील पोलीस कंपाऊंडला आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
दादर येथील पोलीस कंपाऊंडला आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

दादर येथील पोलीस कंपाऊंडला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या 8 गा....

Read more