By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 24, 2020 11:49 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाची चांगलीच चिंता वाढली आहे. त्यातच संसर्ग वाढत असताना आपल्या वार्डात निवडणुकीत निवडून दिलेले नगरसेवक फिरकतही नसल्याने पुण्यातील नागरिक संतप्त झाल्यांच पाहायला मिळत आहे (Banners of missing corporator in Pune). हीच भावना ओळखून पुणे युवक काँग्रेसने पुण्यातील रामवाडी परिसरात जोरदार बॅनरबाजी केली आहे. यावर ‘नगरसेवक हरवले, आता आजारात सोडलं, तसं आम्ही मतदान करताना सोडणार’ असं लिहिलं आहे. यातून गायब नगरसेवकांना निवडणुकीत धडा शिकवण्याचा संदेश देण्यात आला.कोरोना संसर्गाने सामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधी आणि सेलिब्रेटिंनाही वेढा घातला आहे. पुण्यातही महापौरांपासून अनेक नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याचाच परिणाम म्हणून अनेक नगरसेवकांनी घरातच थांबणं पसंत केलेलं दिसत आहे. खबरदारी म्हणून नगरसेवकांनी हा मार्ग अवलंबलेला असला तरी नागरिकांची मात्र गैरसोय होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
“आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत असली, तरी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून यंत्रणेस सहकार्य केले जात नसल्याने नागरिक संतप्त भावना व्यक्त करत आहेत. यंत्रणेला सहकार्य तर सोडाच, परंतु कोणी याबाबत विचारपूसही करीत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे”.
पुण्यातील अनेक भागात आरोग्य सुविधा आणि इतर प्रश्नांवर नगरसेवकांनी आवाज उठवावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीने अनेक नगरसेवक बाहेर पडणं टाळत आहेत. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. हीच भावना ओळखून पुणे युवक काँग्रेसने पुण्यातील राम
युवक काँग्रेसने केलेल्या बॅनरबाजीत आता नागरिकांच्या गरजेच्या वेळी गैरहजर आणि बेपत्ता असणाऱ्या नगरसेवकांना निवडणुकीत धडा शिकवण्याचा इशारा देण्यात आला आहे. तुम्ही आता साथीरोगाच्या काळात जसे आम्हाला सोडलं, तसंच आम्हीही निवडणुकीत मतदाना करताना तुम्हाला सोडणार आहोत, असा संदेश या बॅनरमधून देण्यात आला आहे.
देशात कोरोना व्हायरसचा Coronavirus प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिस....
अधिक वाचा