By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 07:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
वादग्रस्त धर्मोपदेशक झाकीर नाईकची 50 कोटींपेक्षा जास्त संपत्ती सक्तवसुली संचालनालयाने ईडीने जप्त केली आहे. इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या झाकीर नाईकच्या संस्थेवर केंद्र सरकारने या अगोदरच पाच वर्षांची बंदी घातली आहे.
आरोपपत्रानुसार सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने मनी लाँडरिग कायद्यातर्गत झाकीर नाईकच्या 193.06 कोटी रुपयांच्या मालमत्तेची ओळख पटवली आहे. या मालमत्तेवर झाकीर नाईकचा मालकी हक्क असल्याचे ईडीने सांगितले असून त्यापैकी 50.46 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
याआधी मार्च 2019 मध्ये ईडीने झाकीर नाईकच्या एका सहकार्याला मुंबईतून अटक केली होती. व्यवसायाने सोनार असलेल्या नजमुद्दीन साथकला पैशांच्या अफरातफरीप्रकरणी अटक केली होती. झाकीर नाईकला मतद करणे आणि मनी लॉड्रींगमध्ये त्याला मदत करणे असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
18 नोव्हेंबर 2016 रोजी एनआयएने नाईकविरोधात गुन्हा दाखल केला होता. चिथावणीखोर भाषणे दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. देशविरोधी कारवाया करणे, कायदा आणि सुव्यवस्थेविरोधातील कृत्ये करणे, धार्मिक भावना भडकवणारी वक्तव्ये करणे, दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे आणि काळा पैसा सफेद केल्याची आरोपही नाईकवर ठेवण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून झाकीर नाईक देशाबाहेर आहे.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या 334 व्या पालखी सोहळ्याला श्री क्षेत....
अधिक वाचा