By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 21, 2020 02:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
नवी दिल्ली - ऑनलाईन खाद्य पदार्थ डिलिव्हर करणारी प्रसिद्ध कंपनी ‘झोमॅटो’ ने ‘उबर इट्स इंडिया’ कंपनीला विकत घेतले आहे. झोमॅटो कंपनीने उबर इट्सचा भारतीय व्यवसाय तब्बल ३५ कोटी डॉलर म्हणजेच २४८५ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. यामुळे झोमॅटोमध्ये आता उबरचा केवळ ९.९९ टक्के हिस्साच असणार आहे. ‘उबर इट्स’चा आता भारतात स्वतंत्र व्यवसाय न राहिल्यामुळे त्यांच्या युजर्सना झोमॅटोच्या ऍपवर जोडण्यात येणार आहे.
दरम्यान, कॅब सेवा पुरवणारी प्रसिद्ध कंपनी ‘उबर’चा खाद्य पदार्थ पुरवणा-या शाखेचा भारतात चांगला व्यवसाय होत नव्हता, त्यामुळेच कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. उबरच्या धोरणानुसार जर कंपनी मार्केटमध्ये पहिल्या किंवा दुस-या स्थानावर नसेल तर ती तो व्यवसाय सोडून देते. याच धोरणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीचे हे अधिग्रहण केवळ भारतातील उबर इट्ससाठीच आहे. जगातील इतर देशांमध्ये उबर इट्स आपली सेवा कायम ठेवणार आहे. कंपनीने हे देखील स्पष्ट केले आहे की, हा व्यवहार केवळ उबर इट्ससाठी असून कॅब सेवेसाठी नाही.
ठाणे - मध्य रेल्वेवरील डोंबिवली-ठाकुर्ली स्थानकांदरम्यान राजेंद....
अधिक वाचा