ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मधुमेहाच्या रुग्णांची आवळ्याचा असा करावा आहारात समावेश

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 02, 2024 07:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मधुमेहाच्या रुग्णांची आवळ्याचा असा करावा आहारात समावेश

शहर : मुंबई

आवळ्यात अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. याच्या सेवनाने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. तुमच्या आहारात तुम्ही याचा नक्की समावेश केला पाहिजे. आवळा तुम्हाला अनेक गोष्टींपासून वाचवू शकतो. मधुमेहाच्या रुग्णांनी देखील आपल्या आहारात आवळ्याचा समावेश कसा करावा जाणून घ्या.

हिवाळ्यात आवळा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. आवळ्याला पोषक तत्वांचे पॉवरहाऊस देखील म्हटले जाते. आयुर्वेदात आवळ्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. मधुमेह जर नियंत्रणात आणायचा असेल तर आवळा तुम्हाला मदक करु शकेल. मधुमेहासाठी आवळा कसा वापरावा याबद्दल जाणून घ्या.

1. आवळा रस

ताज्या आवळ्याचा रस काढून तुम्ही पिऊ शकता. आवळ्याचा रस थोड्या प्रमाणात पाण्यात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी सेवन करावे. आवळ्यातील उच्च फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते.

2. आवळा पावडर

आवळा चूर्ण स्वरूपात देखील बाजारात मिळतो. विविध प्रकारे तुम्ही आपल्या आहारात आवळ्याचा समावेश करु शकता. आवळा पावडर पाण्यात मिसळा किंवा सॅलड, दही किंवा इतर पदार्थांवर देखील टाकून खाऊ शकता. आवळा पावडरचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखरेचे नियंत्रण चांगले राहते.

3. आवळा सप्लिमेंट्स

आवळा सप्लिमेंट्स देखील बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य डोस निश्चित करु शकता.

4. आवळा चहा

आवळ्याचे सुके तुकडे पाण्यात उकळून घ्या. आपल्या दैनंदिन दिनचर्येत आवळा समाविष्ट करण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्ही दालचिनी देखील टाकू शकता.

5. आवळा आणि मेथीचे मिश्रण

मेथीचे दाणे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. आवळा पावडर आणि मेथीची पावडर यांचे मिश्रण तयार करा आणि ते पाण्यासोबत सेवन करा. मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होईल.

6. आवळा लोणचे

आवळ्याचे लोणचे देखील तुम्ही घरी बनवू शकता. आवळा आणि मसाल्यांचे मिश्रण एकत्र करुन तुम्ही लोणचे बनवू शकता.

आवळ्यात उच्च अँटिऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी, अँटी-डायबेटिक गोष्टी आढळतात. तुम्हाला तुमची जीवनशैली बदलण्याची देखील आवश्यकता आहे. संतुलित आहार खाणे, नियमित व्यायाम करणे तसेच वेळोवेळी तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

 

मागे

मुंबईकरांनो 'या' लक्षणांना हलक्यात घेऊ नका! लगेच डॉक्टर गाठा, महापालिकेने केलं आवाहन
मुंबईकरांनो 'या' लक्षणांना हलक्यात घेऊ नका! लगेच डॉक्टर गाठा, महापालिकेने केलं आवाहन

कोरोनानंतर आता आणखी एका संसर्गजन्य आजाराने डोकं वर काढलं आहे. मुंबईसह महार....

अधिक वाचा

पुढे  

आरोग्यपूर्ण आहार असूनही वजन वाढतंय? या टेस्ट नक्की करून घ्या
आरोग्यपूर्ण आहार असूनही वजन वाढतंय? या टेस्ट नक्की करून घ्या

वैद्यकीय मूल्यमापन, आहारातील बदल, जीवनशैलीत बदल आणि तणाव व्यवस्थापन यांचा ....

Read more