By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 20, 2020 12:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोना व्हायरस जगभरात उच्छाद मांडत आहे. सर्वत्र विनाश करीत आहे. या पूर्वी अशी आणि इतकी आपत्ती कोणीच बघितलेली नसेल. या साथीच्या आजारापासून वाचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. सर्व प्रकारची खबरदारी घेत लोकं घराच्या बाहेर पडत आहे. कोरोनाने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जरी एखाद्याला सर्दी-पडसं, खोकला सध्याच्या कोरोना काळात झाला असल्यास तर मनात कोरोनाचेच नाव येतं. तसेच कोरोना व्हायरसशी दोन चार हात करताना लोकांना इतर आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.
चला जाणून घेऊया की कोरोनाच्या काळात आरोग्यासंबंधी कोणत्या समस्या वाढत आहे.
* मानसिक आरोग्यावर परिणाम :
कोरोना व्हायरसला घेऊन लोकांच्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. सकाळ संध्याकाळ कोरोनाच्या बातम्या ऐकून आणि वाचून लोक मानसिकदृष्ट्या स्वतःला असहज समजतात. त्यांची काळजी वाढते.
* झोप न येणं : कोरोना काळात सतत मनात काळजी आणि बदललेली दिनचर्येमुळे लोकांना निद्रानाश सारख्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. अश्या परिस्थितीत त्याचा थेट परिणाम त्यांचा आरोग्यावर दिसून येत आहे.
* औदासीन्य : कोरोना काळात लोकांवर नकारात्मकतेवर भर पाडत आहे. सततच्या आपल्या नोकरी आणि भविष्याची काळजी तरुणांना औदासिन्यतेच्या दिशेने घेऊन चालली आहे. यासाठी तज्ज्ञ देखील सकारात्मक विचारसरणी ठेवण्याचा आणि त्याच बरोबर चिंतन किंवा मेडिटेशन करण्याचा सल्ला देखील देत आहे. जेणे करून औदासीन्यात आणि नैराश्य येऊ नये.
* मास्क लावल्याने कान दुखणे : कोरोना काळात मास्क लावणे फार आवश्यक आहे. मास्कचा वापर करून आपण या व्हायरसला टाळू शकता. परंतु मास्क वापरल्याने लोकांना अनेक अडचणींना सामोरी जावं लागत आहे. त्यापैकी एक आहे कान दुखणे. बऱ्याच काळ मास्क लावल्याने काही लोकांचे कान देखील दुखत आहे.
* त्वचेसंबंधी आजार : कोरोना काळात मास्क लावणं हा एकमेव उपाय आहे जो कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवतं. पण या मुळे लोकांमध्ये समस्या दिसून येत आहे. मास्कचा वापर बऱ्याच काळ केल्याने त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. उष्णतेमुळे मास्कने चेहऱ्यावर मुरूम, पुरळ आणि त्वचेचे त्रास उद्भवू शकतात.तासनतास मास्क लावून काम केल्याने किंवा रस्त्यावरून चालल्याने ओलावा, घाम येणं आणि घाण जमून राहते. ज्यामुळे चेहऱ्यावर लाल रंगाचे डाग, मुरूम, सूज येणं सारख्या समस्या उद्भवतात.
* श्वासोच्छ्वासाची समस्या :
कोरोना व्हायरसशी वाचण्यासाठी बऱ्याच काळ मास्क लावून ठेवल्यामुळे लोकांना श्वास घेण्याचा त्रास होऊ लागतो. डोकं दुखणं, जीव घाबरणं, डोळ्यापुढे अंधारी येणं
या सारख्या समस्यांना सामोरी जावं लागत.
* हॅन्ड सेनेटाईझर पासून आरोग्याच्या तक्रारी : *हॅन्ड सेनेटाईझर मध्ये ट्रायक्लोसॅन नावाचे एक रसायन असते. ज्याला हाताची त्वचा शोषून घेते. त्याचा अत्यधिक
वापर केल्याने हे रसायन आपल्या त्वचेमधून रक्तात मिसळतं. रक्तात मिसळून हे आपल्या स्नायूंच्या संयोजनांचे नुकसान करतं.
* सेनेटाईझर मध्ये सुवास येण्यासाठी फैथलेट्स नावाचे रसायन वापरले जाते. ज्या सेनेटाईझर मध्ये याचे प्रमाण जास्त असतात, ते आपल्यासाठी हानिकारक
असतात. अश्या प्रकाराच्या अत्यधिक सुवासाचे सेनेटाईझर यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस आणि प्रजनन प्रणालीसाठी हानिकारक असतात.
* सेनेटाईझरमध्ये अल्कोहल चे प्रमाण जास्त असल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर दुष्प्रभाव टाकतात, विशेषतः जर मुले ते अज्ञानात गिळंकृत करतात.
* बऱ्याच संशोधनाच्यामते, याचा जास्त वापर केल्याने मुलांची प्रतिकारक शक्ती कमी होते.
निरोगी राहण्यासाठी शरीर आतून स्वच्छ आणि बळकट असणे गरजेचे आहे. मूत्रपिंडाने....
अधिक वाचा