ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ओव्यापासून होणारे फायदे

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 06, 2019 05:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ओव्यापासून होणारे फायदे

शहर : मुंबई

१.मधुमेहाच्या रोग्यांसाठी ओव्याचे फायदे –

ओव्याचे बीज मधुमेह कमी करण्यास सहाय्यक ठरतात. दररोज ओव्याचे बीज बारीक करून घेतल्यास मधुमेहास नियंत्रणात ठेवता येते.

२.पचनक्रियेत सहाय्यक

पारंपारिक संग्रहित माहितीतून समजते कि ओवा हे एक उत्तम पाचन खाद्य आहे. अपचनात योग्य पचनक्रिया अधिक मजबूत करण्यासाठी जिऱ्याचा वापर नियमित करावा. पालतू जनावरांच्या पचनक्रियेत बिघाड झाल्यास त्यांना ओव्याचीपूड पदार्थात मिसळून देतात. अपचनामुळे होणारे आजार जसे हगवण व उलट्या होणे. याच्या सेवनाने बऱ्यापैकी मदत मिळते. यासाठी एक कप पाण्यात ओव्याचे बीज थोड बारीक करून उकडून व नंतर थंड केल्यावर नियमित देल्यास डायरिया यासारख्या आजारात उचित लाभ मिळतो. हे एक आयुर्वेदात पेय पचनासंबंधीच्या सर्व व्याध्यांवर अतिशय प्रभावशाली ठरते. ओव्यासोबत थोडी साखर सुद्धा खाता येते. यामुळे पोट दुखणे व फुगणे यावर उपाय म्हणून सेवन करता येते.

३. नवजात बालकांच्या पोटातील दुख्ण्यावरील उपाय

ओव्याचे बीज नवजात बालकांच्या पोटातील दुखण्यावर फारच प्रभावशाली मानले जाते. ओव्याचीपूड स्तनातून काढलेल्या दुधात चिमुटभर मिसळून किंवा स्तनावर थोडीसी लेपून नवजात बालकांच्या पोटातील दुखणे व फुगव्यावर फार उपयोगी ठरू शकते.

पोटात वायू आणि फुगारा येत असल्यास पोट दुखायला लागते. त्यामुळे लहान बालक अस्वस्थ होतात व रडतात त्यासाठी ओव्याचीपूड व थोडस मीठ पाण्यात मिळवून दिल्यास लवकरच त्यांना आराम मिळतो.

४.गर्भ धरणात पचना संबंधी समस्या आणि गर्भवती महिलांसाठी अन्न पचनात मदत .

ओव्याचे बीज एन्टीऑक्सिडेटनी भरलेले असतात. जे गर्भवती महिलांसाठी फार उपयोगी ठरतात. तस पाहिलं तर ओवा हे अन्नपदार्थाच्या पचनात सहाय्यक असतात. गर्भवती महिलांच्या कमजोर हाडांना आणि शारीरिक कमजोरीला दूर करण्यास अत्यंत लाभदायक असतात. ओव्याचे बीज गर्भवती महिलांच्या शरीरास आतून मजबूत बनवण्यासाठी हवीशी ताकद देतो. अध्ययानातून हे कळले आहे कि ज्या स्त्रिया आपल्या बाळांना स्तनांनी दूध पाजतात त्यांच्यासाठी ओव्याचे बीज फारच लाभदायक आहे.

 

५.सर्दी पडस्यापासून लगेच मुक्तता

सर्दी पडसा ह्या वारंवार होणार्‍या आजारापासून बचाव व्हावा यासाठी भारतीय घरांमध्ये ओवा वापरला जातो. एका कपड्यात किंवा डबीत ओव्याचीपूड ठेवून त्याचा सुगंध दिवसातून पाचसहा वेळा घेतल्यास नाकातील बंद पडलेल्या नासा खुलून सर्दीपासून आराम मिळतो. ओव्याचीपूड गुळामध्ये मिसळून त्याचे छोटे छोटे गोल गोळे बनवून रोज सकाळ संध्याकाळी घेतल्यास खोकला व अस्तमाच्या तसेच श्वसनाच्या आजारापासून मुक्तता होते.

बालकांमध्ये व वृद्धामध्ये कफ होणे हि समस्या फारच आम आहे. यावर उपाय म्हणून ओव्याचीपूड गरम पाण्यात किंवा जिर्‍याची बीज तोंडात चावून त्यावर गरम पाणी पिल्यास भरपूर आराम मिळतो.

६.हृदयासंबंधी समस्या पासून मुक्तता

ओव्याचीपूड एका कपभर गरम पाण्यासोबत नित्याने सेवन केल्यास हृदयाच्या संबंधी विविध आजारांपासून मुक्तता मिळते. हृदयासंबंधी विविध समस्यांवर ओवा हि एक गुणकारी औषधी मानली जाते.

७. वात रोगात उपायकारक

वातात शरीरात अधिक उत्तेजना वाढून मांस् पेशा आखाडतात त्यामुळे त्या दुखतात यासाठी ओवा हे एक उत्तम उपाय म्हणून वापरले जाते. यात उत्तेजना कमी करून शरीर थंड व स्वस्थ बनवण्याचे गुण आहेत. त्यामुळे ओव्याच्या तेलाने हातापायांची व दुखण्यावर मालिश केल्यास या समस्या दूर होतात.

८.एक कामोत्तेजक औषधी

ओवा हि एक प्राकृतिक कामोत्तेजक वनौषधी मानली जाते. नियमित सेवनाने यौन कामेच्छा वाढून उत्साह वाढतो. त्या सोबत शरीरात धातू वाढवण्यासाठी याचा वापर होतो.

९.क्षय निरोधक ओवा

ओवा क्षयनिरोधक म्हणूनही ओळखले जाते. तत्वे वरील संक्रमण दूर करतो. ओव्याचे बीजांत सापडणारे थीमोल एक शक्तीशाली त्वचारोग विरोधी आणि व्रणविरोधी आहे. ओव्याच्या तेलाचा वापर टूथपेस्ट आणि परफ्युम मध्ये टाकूनही करता येतो. त्वचा रोगात ओव्याचे पान बारीक पिसून संक्रमित ठिकाणी लावल्यास लवकरच आराम मिळतो.

१०.पिडायुक्त दात आणि कान

एक थेंब ओव्याचे तेल कानात टाकल्यामुळे कानाच्या ठणंकन्यावर अत्यंत प्रभावकारी औषध म्हणून ओव्याचा वापर होतो. एक कप पाण्यात चमचाभर मीठ व चमचाभर ओव्याचीपूड घेवून उकडल्यावर थंड करून रोज सकाळ सायंकाळी गुळण्या केल्यास दातांची दुखण्याची समस्या बऱ्यापैकी कमी होते. दातातील किडे मारण्यात हे एक गुणकारी औषध मानले जाते. त्यामुळे दात स्वस्थ राहण्यासाठी नित्यनियमाने रोज हि प्रक्रिया करावी.

 

११.मासपेशीमध्ये ताठरता

ओव्यात शरीरात शांतता मासपेशीमध्ये थंडपणा व स्वस्थता आणण्यासाठी उपयुक्त असे गुण आहेत. त्यामध्ये सापडणारे थीमोल या घटकांमुळे शरीरातील मास पेशी मोकळ्या होतात. ओव्याची बिजातील थिमोल या घटकामुळे पोटदुखी, अस्वस्थता, मास पेशांमध्ये ताठरता, वात आणि दुखणे यापासून आराम मिळतो. महिलांमध्ये मासिक धर्मात शरीरातील दुखण्यावर ओव्याचीपूड सेवनाने लाभ होतो.

१२.ओवा हे एक जीवनविरोधी बीज आहे.

मुखदुर्गंधी मुळे होणाऱ्या समस्येवर ओव्याची बीज चावून खाल्लीतर लवकरच आराम मिळतो. यातील थिमोल हे मुखशुद्धीकारक म्हणूनही काम करते. याचे सेवन सोपेसोबत समप्रमाणात केल्यास मुखदुर्गंधीपासून आराम मिळतो.

१३. मूत्रपिंड आणि यकृतासंबंधी समस्यांसाठी उपाय

ओवा अनेक औषधींमध्ये वापरले जाते. ज्याचा वापर मूत्रपिंड आणि याकृतांच्या रोगांवर होतो. हे एक पोटांच्या विविध आजारांसाठी उत्तम औषधी मानल्या जाते. दारूतील अल्कोहोल ची तृष्णा रोज थोड ओवा तोंडात चावून मिटवली जाते. व मद्यप्राशनाच्या व्यसनापासून मुक्तता मिळते.

१४.श्वासासंबंधी समस्यांचे निवारण

ओव्या थिमोल मुख दुर्गन्धीस कायमस्वरूपी कमी करू शकतो. अस्तमामुळे श्वसनात होणाऱ्या त्रासातून वाचनासाठी रोज नित्यनियमाने जीर बीज तोंडात चावून त्यावर थोड गरम पाणी पिल्याने लवकरच आराम मिळतो. हि क्रिया रोग्याने रोज सकाळीच उठ्ल्यावरच करावी लागते. त्यासोबत खूप गरम केलेल्या भांड्यात ओव्याचीपूड टाकून त्याची धुनी घेवून श्वासात येवू दिल्यास श्वासासाबंधी रोग बरे होण्यास मदत मिळते. 

 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 

मागे

कसे असावे वास्तुप्रमाणे स्टोर रूम
कसे असावे वास्तुप्रमाणे स्टोर रूम

'स्टोर रूम घराच्या दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे असावे. स्टोर रूममध्ये खाण....

अधिक वाचा

पुढे  

शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी  प्यायल्यास होतो अधिक फायदा
शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास होतो अधिक फायदा

पाण्याला तर जीवन संबोधलं जातं, म्हणूनच निरोग़ी आरोग्यासाठी संतुलित आहार, य....

Read more