ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

औषधी गुणकारी दुधीभोपळा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 12, 2019 04:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

औषधी गुणकारी दुधीभोपळा

शहर : मुंबई

भोपळा ही अनेकांची नावडती भाजी, भरीत, कोशिंबिर, सूप असे पदार्थ भोपळ्यपासून बनवले जातात. कितीही नावडता असला तरी गुणधर्मामुळे थोड्या प्रमाणात का होईना, परंतु प्रत्येकाने भोपळा खायलाच हवा. चेहर्यावर पडणार्या सुरकुत्यांपासून पोटाच्या गंभीर विकारांवर भोपळा गुणकारी ठरू शकतो. भोपळ्याच्या अशाच काही औषधी गुणधर्माबाबत जाणून घेऊ.

भोपळ्यात 'बिटा करोटिन'

या घटकाचं प्रमाण बरंच जास्त असतं. यामुळे भोपळा हा जीवनसत्त्वाचा समृद्ध स्त्रोत मानला गेलाय. बीटा केरोटिनमधील आँटिऑक्सिडंट्समुळे शरीरातील फ्री रेडिकल्सचा सामना अगदी सहज करता येतो.

भोपळा हे तापावरचं औषध आहे.

भोपळ्यातील विशिष्य प्रकारच्या खनिजांमुळे मेंदूच्या नसांना आराम मिळतो.

हृदयरोग्यांसाठी भोपळा वरदान मानला जातो. भोपळ्यात कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता असते.

आतड्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनंही भोपळा गुणकरी मानला जातो. भोपळ्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

बहुसंख्य महिलांमध्ये लोहाची कमतरता आढळते. अशा महिलांनी भोपळ्याच्य बियांचं सेवन करावं. भोपळ्याच्या बियांमध्ये लोह, झिंक, पोटेशियम आणि मॅग्नेशियम यांचं प्रमाण भरपूर असल्यानं बरेच लाभ होतात.

पोटाच्या विविध विकारांवर भोपळा गुणकारी ठरू शकतो. यातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट स्वच्छ झाल्याने अनेक रोगांना दूर ठेवता येतं.

 

 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 

मागे

 चुकून खाऊ नये हे पदार्थ, शारीरिक कमतरता जाणवू शकते
चुकून खाऊ नये हे पदार्थ, शारीरिक कमतरता जाणवू शकते

बदलत असलेली जीवनशैलीचा प्रभाव दांपत्य जीवनावर पडत आहे. हल्ली ताणावाच प्रभा....

अधिक वाचा

पुढे  

डायबिटीज नियंत्रित ठेवण्यासाठी रामबाण ठरतील उपाय
डायबिटीज नियंत्रित ठेवण्यासाठी रामबाण ठरतील उपाय

डायबिटीज असल्यास शरीरात ग्लूकोज आणि इन्सुलिनचे संतुलन ठेवणे हे एक मोठे आव्....

Read more