ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उशी न घेता झोपल्याचे आरोग्यदायक फायदे जाणून घ्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 05, 2020 10:07 AM 2019-02-12T14:15:30+5:30

उशी न घेता झोपल्याचे आरोग्यदायक फायदे जाणून घ्या

शहर : मुंबई

आपल्याला वर्षानुवर्षे उशी घेऊन झोपण्याची सवय आहे आणि आपण विचार करीत आहात की उशी न घेता झोपल्याने मानदुखीचा त्रास होऊ शकतो. तर आपण चुकीचा विचार करीत आहात. उशी न घेता झोपल्याने आपल्याला अनेक प्रकारे शारीरिक आणि मानसिक फायदे होऊ शकतात. आपण अनभिज्ञ असल्यास जाणून घ्या उशी घेतल्याशिवाय झोपण्याचे 5 फायदे.

1 जर आपल्याला पाठदुखी, कंबरदुखी आणि स्नायूंमध्ये वेदना जाणवतात तर उशी न वापरता झोपावे. वास्तवात हा त्रास पाठीच्या कणेमुळे उद्भवतो. ज्याचे कारण आपली झोपण्याची चुकीची सवय आहे. उशी न घेता झोपण्याच्या सवयीमुळे आपला पाठीचा कणा सरळ राहतो आणि आपला हा त्रास कमी होईल.

2 साधारणपणे आपल्या मानेमध्ये आणि खांद्यांमध्ये वेदना व्यतिरिक्त मागील बाजूस त्रास आपल्या उशी घेण्याचा सवयीमुळे होतो. उशी न घेता झोपल्याने या अवयवांमध्ये रक्त परिसंचरण चांगले होईल आणि वेदनेपासून सुटका होईल.

3 कधी कधी चुकीच्या पद्धतीने उशीचा वापर केल्याने आपल्या मानसिक त्रास देखील उदभवू शकतात. उशी कडक असल्यास आपल्या मेंदूवर अनावश्यक तणाव येऊ शकतो. ज्यामुळे मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते.

4 तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की उशी घेतल्याशिवाय झोपणे आपल्याला शांत झोप घेण्यास मदत करते. आपण चांगली झोप घेऊ शकता. ज्याचं आपल्या मनावर आणि आरोग्यावर चांगला प्रभाव पडतो.

5 जर आपल्याला सवय आहे उशीमध्ये तोंड घालून झोपण्याची. तर या सवयीमुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात. या व्यतिरिक्त ही सवय आपल्या चेहऱ्यावर तासंतास दाब बनवून ठेवते. ज्यामुळे रक्त परिसंचरणवर प्रभाव पडतो आणि चेहऱ्याच्या समस्या उद्भवतात.

 

Recommended Articles

मागे

Immune system करा strong, आपल्यासाठी खास 10 टिप्स
Immune system करा strong, आपल्यासाठी खास 10 टिप्स

कोणत्याही आजराला लढा देण्यासाठी शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती मजबूत असणे ग�....

अधिक वाचा

पुढे  

कोरोना काळात हृदयरूग्णांसाठी दिलासादायक बातमी
कोरोना काळात हृदयरूग्णांसाठी दिलासादायक बातमी

सध्या देशभरात कोरोना व्हायरस विषाणूंची लागण झालेल्या रूग्णांची संख्या झप�....

Read more