ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Health Tips : हळदीच्या दुधाचे 'हे' आहे आरोग्यदायी फायदे

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 20, 2020 02:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Health Tips : हळदीच्या दुधाचे 'हे' आहे आरोग्यदायी फायदे

शहर : मुंबई

हळदीचं दूध आरोग्यासाठी चांगलं असतं हे तुम्ही अनेकदा वयस्कर लोकांकडून ऐकलं असेच. दुधातून आपल्याला कॅल्शिअम भरपूर मिळते. हळदी ही अॅंटीबायोटीक म्हणून ओळखली जाते. वजन कमी करणे, जखमेवरील मलम, त्वचेसाठी हळदीचा वापर होतो. मात्र याच हळदीचे दुधाबरोबर सेवन केल्यास त्याचा जास्त फायदा होतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळद अतिशय गुणकारी आहे. हळदीमध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल गुण असतात. ज्यामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या विकारावर हळद गुणकारी ठरते. तसेच आजार लवकर बरा होण्यासही मदत मिळते.

जर तुम्हाला एखाद्या कारणामुळे जखम झाली तर त्याठिकाणी हळद हे अँटीबॅक्टेरिअल म्हणून काम करतं. हळद बॅकटेरिया मारण्यासाठी मदत करतं. त्यामुळे जखम झाल्यास हळद लावली जाते.

हळद दूध रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करते. विविध अभ्यासानुसार असे सांगितले आहे की, मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. तसेच कर्करोगाचा धोका कमी होतो.

हळद दुधामुळे पचन करण्यास मदत करते. यामुळे शरीरातील आंबटपणा कमी होतो. हळद मिसळून जास्त प्रमाणात दूध पिल्यास त्रास होऊ शकतो. म्हणून, एक चिमूटभर हळद दुधात मिसळणे आपल्यासाठी फायदेशीर आहे.

हळद दुधात एक चिमूटभर मिरपूड ठेवल्यास घसा खवखवणे आणि संसर्ग कमी होण्यास मदत होते.

हळदीच्या दुधाचे आणखी फायदे करून घ्यायचे असतील, तर हळदीच्या पावडर ऐवजी कच्ची हळद दुधामध्ये घालून ते दुध प्यावे.

झोपण्यापूर्वी तासभर आधी ग्लासभर गरम दूध प्यायल्यास शांत झोप मिळण्यास मदत होते.

मागे

कोरोना काळात वाढत आहे हे 10 आजार
कोरोना काळात वाढत आहे हे 10 आजार

कोरोना व्हायरस जगभरात उच्छाद मांडत आहे. सर्वत्र विनाश करीत आहे. या पूर्वी अश....

अधिक वाचा

पुढे  

सर्दी- पडसं, आणि फ्लू पासून आराम देणारा आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा
सर्दी- पडसं, आणि फ्लू पासून आराम देणारा आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा

निरोगी आहार, व्यायाम आणि वेळेवर झोपणं या अश्या गोष्टी आहेत ज्या आपल्या रोग प....

Read more