ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आवर्जून करा 'ब्रेकफास्ट' पुढील पदार्थांनी होईल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 06:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आवर्जून करा 'ब्रेकफास्ट' पुढील पदार्थांनी होईल

शहर : मुंबई

आजच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात अनेक जण 'ब्रेकफास्ट'ला (नाश्ता) सुट्टी देतात. मात्र, ही सुट्टी तुमचे आरोग्य बिघडवू शकते, याची कल्पना अनेकांना नसते. एकवेळ दुपारी जेवण घेवू नका, मात्र नाश्ता केलाच पाहिजे. त्यामुळे तुमचा उत्साह कायम राहतो आणि काम करण्याची शक्ती मिळते. त्यामुळे नाष्टा किती महत्त्वाचा आहे, हे तुमच्या लक्षात येईल. वजन कमी करण्याचासाठी किंवा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तर काही जण ऑफिसला निघण्याच्या घाईमुळे सकाळच्या नाष्टाला सुट्टी देतात. पण, नाश्ता घेता दिवसाची सुरुवात करणे योग्य नाही.

. ताजी फळे, टोस्ट, मोड आलेली कडधान्य, ओट किंवा पोळी-भाजी यांचा समावेश असणारा हेल्दी ब्रेकफास्ट आरोग्याबरोबरच चांगला असतो. त्यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाणे राहता. रोज नियमितपणे संतुलित आहार घेण्यासाठी अनेक जण काटेकोरपणे पालन करतात. तर काही जणांना याचे फारसे महत्त्व वाटत नाही. आरोग्याची काळजी घेण्यासाठी चौरस आणि संतुलित आहार जेवढा महत्त्वाचा तेवढाच रोजच्या रोज सकाळी ब्रेकफास्ट आवश्यक आहे.

. फायबरयुक्त नाष्टा सकाळी घेतल्याने त्याचा नेहमी फायदा होतो. धान्यावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेच्या दरम्यान त्यातील शरीरासाठी आवश्यक फायबर (तंतूमय पदार्थ) निघून जाते. म्हणूनच नेहमी अख्ख्या ग्रेन प्राॅडक्ट्सचा आहारात समावेश व्हावा, असं सांगितलं जातं. यासाठी ब्राऊन राइस, होल ग्रेन ब्रेड यामधून अधिकाधिक प्रमाणात फायबर मिळवता येईल.फायबरमुळे तंतूमय पदार्थांमुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते, कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होते. वजन नियंत्रणात राहते. हे फायबर फळे, भाजी, ज्वारी,बार्ली, बीज, गाजर यातून मिळते. याचा वापर नेहमी नाश्तामध्ये करणे आवश्यक आहे. ज्यूसऐवजी ताजी फळं खा. फळांच्या सालीत, बियांमध्ये आणि गरात फायबर अधिक प्रमाणात असतं. मोड आलेली कडधान्यं अधिक प्रमाणात खावीत.

. नाश्त्यासाठी कॉर्नफ्लेक्स, रागी, ज्वारी, बार्ली, ब्राऊन राइस, ओटमील या पदार्थांचा समावेश करा. फळापेक्षा ७५ टक्के अधिक फायबर सफरचंदाच्या सालीतून मिळतं. पण, सालासकट फळं किंवा भाज्या खाताना त्या स्वच्छ धुवून घ्यायला विसरू नका.

. पोहे, उपमा यासारख्या पदार्थांमध्येही फरस बी, गाजर, बीट यासारख्या भाज्या टाकता येतील. नाश्त्यासाठी चपाती-भाजी हाही चांगला पर्याय आहे. पदार्थ खूप शिजवू नका. खूप शिजवल्याने त्यातील फायबरचं प्रमाण कमी होतं. चावता येतील आणि पचायला जड जाणार नाहीत इतपतच शिजवा किंवा वाफवा.

. नट्स, सीड्स, मोड आलेली कडधान्य अधिक प्रमाणात खावीत. टोमॅटोसारखी फळं बियांसकट खायला हवीत. कारण या फळांमधील बिया काढून टाकल्याने त्यातील फायबरचे प्रमाण कमी होते.

. भरपूर पाणी प्यायला पाहिजे. दिवसभरात भरपूर पाणी प्यायला हवे. कमीतकमी ते १० ग्लास पाणी प्यावे. फायबरयुक्त पदार्थांचे योग्य पचन होऊन त्यांचे कार्य नीट व्हावे, यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक असते.

 

मागे

कॅन्सर रुग्णांसाठी हे उपाय फायद्याचे
कॅन्सर रुग्णांसाठी हे उपाय फायद्याचे

अहवालानुसार भारतामध्ये दर 20 वर्षात कर्करोग रुग्णांची संख्या दुप्पट होते. य....

अधिक वाचा

पुढे  

विषाणू ओळखणारे सुलभ उपकरण विकसित
विषाणू ओळखणारे सुलभ उपकरण विकसित

           माणसाला अनेक रोग हे विषाणूंमुळे होत असतात. हे विषाणू पकडून त....

Read more