ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

त्वचा भाजल्यावर करा हे घरगुती उपाय ...

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 03, 2019 03:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

त्वचा भाजल्यावर करा हे घरगुती उपाय ...

शहर : मुंबई

गरम पाणी पडल्याने किंवा पेटल्याने वा गरम भांड्याला हात लागल्याने आपण भाजले जातो. भाजल्यामुळे जखमही होतात. कधी हे भाजणं साध असतं तर कधी गंभीर रूप धारण करतं. जखम तीव्र, मध्यम किंवा तीव्र रक्तस्त्रावी असते. म्हणून भाजल्यानंतर ही काळजी घ्या.

  • जखमेवर बर्फ लावण्याऐवजी भाजल्याबरोबर त्यावर पाण्याची धार सोडा. हे शक्य नसल्यास एका भांड्यात थंड पाणी घेऊन त्यात जखमी भाग बुडवून ठेवा.
  •  तूप, तेल, टूथपेस्ट किंवा कोणताही तरल पदार्थ जखमेवर लावू नये. त्याऐवजी एखादं अॅटीबायोटिक क्रीम लावावं.
  • भाजलेल्या भागाला कापूस किंवा कापडाने झाकू नये.
  • जखमेवरील फोड फोडू नये.
  • जखमेत जंतूसंसर्ग झाला असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

काही घरगुती उपाय

  •  कोरफडीच्या गरामध्ये जखम बरी करण्याचे गुणधर्म असतात. जखमेमुळे त्वचेचा दाह होत असेल तर हा गर त्यावर लावावा.
  • फ्रीजमध्ये ठेवलेली टी बॅग काही काळ जखमेवर दाबून धरा. याने वेदना आणि दाह कमी होईल.
  • गरमऐवजी गार पाण्याने अंघोळ करा.
  •  व्हिनेगर आणि पाण्याचा मिश्रणात कापूस किंवा कापड बुडवून त्याला जखमेवर काही काळ दाबून ठेवा. नंतर जखमी भाग वाहत्या पाण्याखाली धरा.
  •  हे उपाय साध्या जखमेसाठी असून भाजल्याचे स्वरूप तीव्र असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

मागे

तंबाखू, सिगारेटची घातक सवय..World No Tobacco Day
तंबाखू, सिगारेटची घातक सवय..World No Tobacco Day

आज जगभरात World No Tobacco Day साजरा केला जात आहे. तंबाखू, सिगारेट सोडण्यासाठी मोठ्या इच....

अधिक वाचा

पुढे  

वजन कमी करायचं असेल तर लंच घ्या 3 दुपारी तीन च्या आधी
वजन कमी करायचं असेल तर लंच घ्या 3 दुपारी तीन च्या आधी

एका शोधाप्रमाणे दुपारी तीन वाजेनंतर लंच करणार्‍यांमध्ये वजन कमी होण्याची....

Read more