By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 28, 2019 06:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्त्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे, तर चेहऱ्यावरील काळे डाग जाऊन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो.
ताकात व्हिटॅमिन 'B12', कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरससारखी तत्वे असतात जी शरीरासाठी फारच फायद्याची असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक प्यायल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज ९० % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसानेसुद्धा दररोज ताक प्यायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकद प्रचंड प्रमाणात वाढते. ज्यांनी यापूर्वी पंचकर्म केलेले आहे त्यांनी हा प्रयोग करून पाहावा फरक जाणवेल. तुमची तब्येत ठीक तर होईलच, पण पैसाही वाचेल. असे सहा महिन्यांत एक वेळ करा, आपणास होणारे भावी मोठे आजारही टळतील. त्यामुळे होणारा त्रास व औषधी खर्चही वाचेल.
ताक पिण्याचे खालील १० फायदे
महत्त्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने स्वास्थ्य चांगलं राहत, पोट सुध्दा एक....
अधिक वाचा