By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2020 10:22 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कापूर आपल्या अँटिबायोटिक आणि अँटीफंगल गुणधर्मामुळे पूजा-हवन साहित्याच्या व्यतिरिक्त आरोग्य आणि सौन्दर्यासाठी देखील फायदेशीर आहे. जर आपण याचा समावेश सौंदर्य प्रसाधनांमध्ये देखील केलास, तर आपल्या बऱ्याचश्या समस्या नाहीश्या होतील. कापूर जेवढे लाभदायक आहे तेवढेच अधिक मूल्यवान आहे कापराचं तेल. कापराच्या तेलाचे जादुई फायदे जाणून घ्या. परंतु त्यापूर्वी आम्ही आपल्याला सांगत आहोत की कापराचं तेल घरच्या घरी कसे बनवू शकता.
तसे तर कापराचं तेल बाजारपेठेत देखील उपलब्ध आहे, पण याला घरात देखील सहजरित्या तयार करू शकता. घरी बनविण्यासाठी नारळाच्या तेलात कापराचे काही तुकडे घाला आणि एखाद्या हवाबंद डब्यात भरून ठेवावं. काही काळा नंतर हे तेल कापराचे घटक शोषून घेतं आणि झाले कापराचे तेल तयार.
आता जाणून घेऊया याचे 8 जादुई फायदे.
1 कापराच्या तेलाला त्वचेवर लावल्यानं गळू-पुटकळी आणि मुरूम बरे होऊ लागतात. हे मुरुमांना कमी करतंच, त्याशिवाय त्वचेवरील मुरुमांच्या डागाला देखील मुळातून काढून टाकतो.
2 एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात थोडंसं कापराचं तेल घाला. आता काही काळ त्यामध्ये आपले पाय बुडवून बसा. यामुळे आपल्या टाचा देखील स्वच्छ होतील आणि भेगा पडलेल्या टाचा देखील बऱ्या होतील. आपल्या पायात काही बुरशीजन्य संसर्ग झाले असल्यास बुरशीजन्य संसर्ग देखील नाहीशे होतील आणि वेदना पासून आराम मिळेल.
3 कापराचं तेल केसांमध्ये लावल्यानं केस वेगाने वाढतात, बळकट होतात आणि गळणे थांबतात. यासाठी कापराचं तेल दह्यात मिसळून केसांच्या मुळात लावावं आणि एक तासानंतर केसांना धुवावं.
4 त्वचेवर जळण्याचे किंवा फाटण्याचे डाग असल्यास कापराचं तेल त्या जागी लावल्यानं डाग पुसट आणि फिकट होतात.
5 त्वचे चेकोणतेही त्रास असो, कापराचं तेल त्याला नाहीसे करून आपल्याला स्वच्छ, निरोगी, गुळगुळीत आणि डाग रहित त्वचा देतं.
6 अंतर्गत वेदनेमध्ये देखील कापराचं तेल खूप प्रभावी आहे. शरीराच्या कोणत्याही भागात वेदना होत असल्यास कापराचं हे तेल कोमट करून त्या जागी चोळल्यानं वेदनेपासून आराम मिळतो.
7 ताण कमी करण्यासाठी कापराचं तेल फायदेशीर असत. याला कपाळी लावा किंवा केसात याची मॉलिश केल्यानं तणाव कमी होतो.
8 केस गळत असल्यास किंवा केसात कोंडा झाला असल्यास, कापराच्या तेलानं मालीश करावी. या दोन्ही समस्यांचा निराकरण होईल, केस परत येण्यास मदत मिळेल.
हृदयरोग आणि हृदय विकाराच्या झटका येण्याचे सर्वात मोठे कारण आहे, हृदयाच्या ....
अधिक वाचा