By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 22, 2019 08:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
व्हिटॅमिन डी मुळे यकृताच्या कॅन्सर होण्याचे प्रमाण अतिशय कमी असते, असे एका पाहणीत दिसून आले आहे. सूर्यप्रकाश त्वचेवर पडल्यानंतर त्यातून व्हिटॅमिन डी तयार होते. शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण योग्य ठेवतानाच हाडे, दात आणि स्नायू देखील व्हिटॅमिन डी मुळे मजबूत राहतात, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र या जीवनसत्त्वाचा त्यापेक्षाही पुढचा उपयोग कॅन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी होऊ शकतो, असा दावा जपानच्या संशोधकांनी केला आहे.
युरोप आणि अमेरिकेतील लोकांमध्ये केलेल्या अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे. जपानच्या शिगा वैद्यकशास्त्र विद्यापीठात याबाबत संशोधक सुरु असून सर्वच प्रकारच्या कॅन्सरवर व्हिटॅमिन डी उपयोगी ठरु शकेल काय? याचीही चाचणी केली आहेत. 40 ते 69 वयोगटातील 33 हजार पुरुष आणि महिलांची पाहणी या संशोधनात करण्यात आली.व्हिटॅमिन डी मुळे यकृताचा कॅन्सर होण्याचे प्रमाण अतिशय कमी हे तर सिद्ध झाले आहे.
गोमूत्राचे नाव काढल्यावर आपण नाक दाबत असलो तरी त्याच्या औषधी गुणधर्माकडे द....
अधिक वाचा