By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 21, 2019 07:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा उपयोग करत असाल तर सावधान. या गोळ्या तुमची हाडे ठिसूळ करू शकतात. या गोळ्यांमुळे मासिक पाळीत बदल घडतो व त्याचा परिणाम हाडांवर होऊन ते कमजोर होतात. हाडे मजबूत राखण्यासाठी महिलांना रोज चांगला व्यायाम व दूध पिणे गरजेचे आहे.
न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठ व हेलन हेज हॉस्पिटल यांच्यातर्फे संयुक्त संशोधक पथकातर्फे यासंदर्भात संशोधन करण्यात आले. त्यात ही बाब आढळली. या पथकाचे सदस्य डॉ. जेरी नीव्ज यांनी महिलांची जीवनशैली, त्यांचे खाणेपिणे व व्यायामाच्या सवयींचा अभ्यास केला. या सर्व महिलांचे सरासरी वय १८.४ होते.
संशोधन करणाऱ्या पथकाने महिलांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले. दूध, दही, पनीर व कॅल्शियमचा समावेश असणाऱ्या भाज्यांचा वापर कोण व किती करतात याकडे लक्ष देण्यात आले. याशिवाय कॅफीन, अल्कोहोल, तंबाखू खाण्याचा काय परिणाम होतो, हेही अभ्यासण्यात आले.या महिलांच्या मासिक पाळी व गर्भ निरोधक गोळ्यांच्या उपयोगासंदर्भातील आकडेवारी एकत्र करण्यात आली.
विश्लेषणानंतर गर्भ निरोधक गोळ्या घेण्यामुळे मासिक पाळीत बदल होतो व त्याचा हाडांवर परिणाम होऊन ती कमजोर होतात असे लक्षात आले. ज्या महिला दूध घेण्याचे टाळतात, त्यांची हाडे जास्त कमकुवत असल्याचे लक्षात आले.
योगाचा प्रवास सुरू करण्यापूर्वी योग मार्गदर्शकाचा सल्ला व मार्गदर्शन घेण....
अधिक वाचा