By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2020 12:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोना व्हायरस ज्याने सर्वत्र लोकांचा मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहेत. या व्हायरसापासून सुटका आणि बचाव करण्यासाठी प्रत्येकजण आप आपल्या परीने प्रयत्न करीत आहे आणि वेगवेगळ्या पद्धती वापरत आहे. पण या काळात हवामानातील बदल मुळे होणाऱ्या सर्दी पडसं याला देखील कोरोनाशी जोडून बघत आहे, कारण कोरोना व्हारयसचे लक्षण देखील सर्दी, पडसं, नाक गळणे, खोकला आणि तापाचे आहे. अश्या परिस्थितीत अस्वस्थ होऊ नये किंवा घाबरून जाऊ नये तर काही अश्या गोष्टींना आपल्या आयुष्यात समाविष्ट करावं जेणे करून या व्हायरसावर विजय मिळवता येईल, तेही न घाबरता.
कोरोना पासून वाचण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता हा एकमेव उपाय आहे. म्हणून आपल्या हाताला स्वच्छ करणे विसरू नये. हाताला वारंवार धुणं कोरोनाला स्वतःपासून दूर ठेवण्याचा सर्वात अचूक मार्ग आहे. या साठी आपल्या हाताला वेळोवेळी सेनेटाईझ करावं. घराच्या बाहेर असल्यास सेनेटाईझरचा वापर करावा. घरात असल्यास साबणाने आपल्या हाताला चांगल्या प्रकारे स्वच्छ करावं.
* घरातून बाहेर पडताना मास्क वापरावं. आपण घराच्या बाहेर निघाल्यावर किंवा वर्दळीच्या ठिकाणी गेल्यावर मास्क आवर्जून वापरावा.
* बहुतेक लोकांना आपल्या डोळ्यांना चोळण्याची, किंवा चेहऱ्याला हात लावण्याची सवय असते. कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी आपल्या चेहऱ्याला पुन्हा पुन्हा हात लावणं टाळावं. जर आपण आपल्या चेहऱ्याला वारंवार हात लावला तर जाणता अजाणता आपण स्वतःच या व्हायरसला आपल्या शरीरात प्रविष्ट करू शकता.
* दुसऱ्या व्यक्ती बरोबर हात मिळवणी करू नका. 'नमस्ते' करणं या कोरोनाच्या काळात सर्वात जास्त योग्य आहे. हात मिळवणी करून व्हायरस सहजपणे एका व्यक्ती पासून दुसऱ्या पर्यंत जाऊ शकतं.
* मॉल्स किंवा वर्दळ असलेल्या जागी जाणं टाळावं, कारण या पैकी कोणाला या विषाणूची लागण लागलेली आहे हे सांगणं अवघड आहे. अश्या परिस्थितीत डॉक्टर देखील सुचवीत आहे की कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी या काळात मॉल्स मध्ये जाऊ नये.
* आपल्या मोबाईल आणि लॅपटॉप वेळोवेळी स्वच्छ आणि सेनेटाईझ करावं जेणे करून आपण या व्हायरसच्या संपर्कात येणं टाळू शकता.
* बाहेरून घरी आल्यावर घरातील इतर सदस्यांशी संपर्कात येण्यापूर्वी अंघोळ करून आपले कपडे बदलून स्वच्छ चांगले कपडे घाला, मगच आपल्या कुटुंबीयातील इतर सदस्यांशी संपर्क करा.
* आपली रोग प्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी हर्बल चहा चे नियमाने सेवन करावं.
* रात्री झोपण्याच्या पूर्वी हळदीचे दुधाचे सेवन करावं हे आपल्या प्रतिकारक शक्तीला किंवा क्षमतेला बळकट करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
* सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करीत असल्यास सावधगिरी बाळगा आणि मास्क आणि ग्लव्ज वापरा.
हवामान बदल्यानंतर घसा खवखवणे किंवा घसा बसणे अशी तक्रार येत असते. घसा खराब म्....
अधिक वाचा