By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 16, 2020 03:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोना व्हायरसला (Corona Virus) न घाबरता, त्याबाबत खबरदारी बाळगून योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. हात धुण्यासाठी साबण किंवा सॅनिटायझर नसेल तरीही या व्हायरसपासून दूर राहता येऊ शकतं. त्यासाठी अतिशय सोपं काम करायचं आहे. घरात लिंबू ठेवल्याने या व्हायरसपासून बचाव करता येऊ शकतो.
माजी राष्ट्रपतींचे चिकित्सक आणि देशातील प्रसिद्ध डॉक्टर मोहसिन वली Mohsin Wali यांनी, हात धुण्यासाठी लिंबूचा वापर केल्यास व्हायरस जवळही फिरकत नसल्याचं सांगितलंय. भारतात हात धुण्यासाठी अनेक काळापासून लिंबूचा वापर केला जात आहे. डॉ. वली यांनी सांगितलं की, हात धुण्यासाठी पारंपारिक गोष्टींचा वापर केल्यास कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव केला जाऊ शकतो.यासंबंधी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना व्हायरस पसरल्यानंतर अचानक बाजारात सॅनिटायझर्सची कमतरता भासू लागली आहे. पण अजूनही अनेक लोक ही गोष्ट समजून घेत नाहीत, की कोरोनापासून वाचण्यासाठी सॅनिटायझर किंवा साबण नाही तर, हात स्वच्छ, साफ ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळेच डॉक्टरांकडून वारंवार पाण्याने हात धुण्याचा सल्ला दिला जात आहे. अनेक दुर्गम गावांत, खेड्यात सॅनिटायझर उपलब्ध नसते. अशावेळी पाणी आणि लिंबू रसने हात धुता येऊ शकतात. हात स्वच्छ, साफ ठेवण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे.
२०१७ मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, बॅक्टेरिया मारण्यासाठी लिंबू अतिशय प्रभावशाली आहे. 'द जनरल ऑफ फंक्शनल फूड्स'मध्ये दिलेल्या माहितीनुसार, E. coli ई-कोलाईसारख्या महामारीशी लढण्यासाठी लिंबूचा रस अतिशय प्रभावी ठरला होता. संशोधकांनी सांगितलं की, कोणत्याही संसर्गावेळी सॅनिटायझर किंवा साबण मिळत नसल्यास लिंबू रसाने हात धुवून आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, हात साफ करण्यासाठी सर्वात आधी लिंबाचा रस हातावर घ्या. रस दोन्ही हातांवर पसरवून हात स्वच्छ करा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने दोन्ही हात धुवून, साफ कपड्याला पुसा.
कोरोना व्हायरसच्या प्रभाव वाढत आहे. देशात आणि राज्यात रुग्णांच्या संख्येत ....
अधिक वाचा