By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 31, 2020 01:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सध्या देशभरात कोरोना व्हायरस विषाणूंची लागण झालेल्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. संसर्गाची लागण टाळण्यासाठी अनेक रूग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परंतु, कोरोनरी आर्टरी बायपास, ग्राफ्टिंग (सीएबीजी) किंवा व्हॉल्वह रिपेयरिंग/ रिप्लेसमेंट यासारख्या शस्त्रक्रियेची अनेक हृदयरूग्णांना गरज असते. परंतु, या शस्त्रक्रिया केल्या जात नव्हत्या. पण शस्त्रक्रियेअभावी या रूग्णांमध्ये कोरोना विषाणूंची लागण होऊ शकते. मात्र, आता सर एच.एन.रिलायन्स अँण्ड रिसर्च सेंटर मध्ये आवश्यक काळजी घेऊन इलेक्टिव कार्डियाक शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल अँण्ड रिसर्च सेंटरचे हृदयविकार तज्ज्ञ डॉ. बिपिनचंद्र भामरे यांनी सांगितले.
हृदयविकार असणाऱ्या रूग्णांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका हा सर्वांधिक असतो. या रूग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने संसर्गाची लागण होऊ शकते. परंतु, भितीमुळे अनेक रूग्ण शस्त्रक्रिया करून घेण्यास टाळाटाळ करतात. वेळीच शस्त्रक्रिया न झाल्यास रूग्णांच्या जीवावर बेतू शकतं. याशिवाय शस्त्रक्रियेच्या प्रतिक्षायादीवर असताना गुतांगुत अधिक वाटू शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अत्यंत गरज असल्यास हृदयावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. कोविड-१९ प्रोटोकॉलनुसार योग्य ती काळजी घेऊन ओपन हार्ट सर्जरी सुरक्षितपणे करता येऊ शकते.
कोविड-१९ रूग्णांची वाढती संख्या विचारात घेता सरकारने संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू केली होती. मात्र, आता केंद्र सरकारने लॉकडाऊन उठवायला सुरूवात केली आहे. तसेच राज्य सरकारने सुद्धा टप्प्याटप्प्याने अनेक भागातील निर्बंध हटविले आहेत. परंतु, मुंबई शहरात रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अनावश्यक कामे करण्यासाठी घरातून बाहेर पडू नयेत, असेही सांगण्यात आले आहे. अशात हृदयविकाराने त्रस्त असणारे रूग्ण पुन्हा सर्व सुरळीत कधी सुरू होईल? जेणेकरून (इलेक्टिव कार्डियाक शस्त्रक्रिया) निवडक हृदय शस्त्रक्रिया सुरू होतील, याची रूग्ण वाट पाहत होते. त्यानुसार आता या शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत.
तज्ज्ञ डॉक्टरांनी म्हटले की, इलेक्टिव कार्डियाक शस्त्रक्रिया म्हणजे रूटीन सीएबीजी, व्हॉल्व्ह रिपेयरिंग / रिप्लेसमेंट सारखी नियमित हृदय शस्त्रक्रिया. कोरोनरी आर्टरी या हृदयविकाराने त्रस्त असणाऱ्या रूग्णाला हार्ट वाल्व्हची समस्या जाणवते. या रूग्णांना शस्त्रक्रियेदरम्यान संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे हे रूग्ण शस्त्रक्रिया टाळतात. वेळेवर शस्त्रक्रिया न झाल्यास विविध गुतांगुत वाढून जीवाला धोका संभवू शकतो.
सर एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल अँण्ड रिसर्च सेंटरचे कॉर्डिओ-थोरॉसिस सर्जन डॉ. बिपिनचंद्र भामरे म्हणाले की, रूग्णांच्या हिताच्या दृष्टीकोनानं विचार करून आम्ही निवडक शस्त्रक्रिया करण्याला सुरूवात केली आहे. १ जूनपासून अत्यावश्यक असणाऱ्या रूग्णांवर शस्त्रक्रिया केली जात आहे. या शस्त्रक्रिया करताना कोविड-१९ बाबत केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळल्या जात आहेत. त्यानुसार दर आठवड्याला आम्ही ३ ते ४ हृदयाचा विकार असणाऱ्या रूग्णांवर शस्त्रक्रिया करत आहोत. हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी अनेक महिन्यांपासून वाट पाहणाऱ्या रूग्णांच्या आजाराची तीव्रता लक्षात घेऊन अशाच रूग्णांवर शस्त्रक्रिया केली जात आहे. कोविड-१९ प्रोटोकॉलअतंर्गत या शस्त्रक्रिया काळजीपूर्वक केल्या जात आहेत.
वॉशिंन्टन पोस्ट ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकत कोरोना व्हायरसमुळे फक्त महिन्याभरात एक लाख नागरिकांना जीव गमवावा लागला होता. यातील बहुतांश लोकांना हृदयविकाराचा त्रास असल्याचे समोर आले आहे. याशिवाय कोरोनाच्या हॉटलिस्टवर असणाऱ्या न्यूयॉर्क शहरात मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात हृदयविकाराच्या समस्येमुळे ८,३०० लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
अशी घ्या खबरदारी
मुंबईतील अनेक रूग्णालयांमध्ये कोविड-१९ प्रोटोकॉलद्वारे रूटीन शस्त्रक्रिया करायला सुरूवात केली आहे. परंतु, रूग्णालयात अन्य व्यक्तीला प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.
रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना चेहऱ्यावर मास्क किंवा कपडा बांधायला सांगा
रूग्णांवर उपचार करताना सर्व आरोग्य कर्मचारी मास्कचा वापर करतात का याची खात्री करून घ्या
रूग्णालयात प्रवेश करणाऱ्यापूर्वी प्रत्येकाला हॅंड सॅनिटायझर्स देण्यात येत आहे. याशिवाय सामाजिक अंतरही पाळले जात आहे.
नियमित साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. वैद्यकीय उपकरणेही दररोज निर्जंतुकीकरण केली जातात. रूग्णांना भेट देणारे सर्व वैद्यकीय कर्मचारी त्यांचे वैयक्तिक संरक्षक उपकरणे परिधान करत आहेत.
आपल्याला वर्षानुवर्षे उशी घेऊन झोपण्याची सवय आहे आणि आपण विचार करीत आहात क....
अधिक वाचा