ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नागपुरात डेंगूची शतकी खेळी

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 20, 2019 02:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नागपुरात डेंगूची शतकी खेळी

शहर : नागपूर

परतीच्या पावसाच्या वातावरणात भर उन, ढगाळ वातावरण आणि रात्रीच्या वेळी बरसणाऱ्या पाऊसधारांमुळे आजारांचा विळखा वाढत आहे. त्यामुळे मलेरिया, स्वाइन फ्लू आणि डेंग्यूच्या तापेने नागरिक त्रस्त झालेले आहेत. चालू वर्षात आतापर्यंत अनेक जणांना डेंग्यूच्या डासांनी डंख मारला आहे. त्यातील एकट्या नागपूर शहरातील रुग्णांच्या संख्येने शतकी आकडा ओलांडला आहे.

ग्रामीण भागातही 25 जण डेंग्यूग्रस्त आढळल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. या भागात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्याचे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी दुजोरा देताना सांगितले. शहरात डेंग्यूचा उद्रेक कायम असूनही याकडे महापालिकेचा आरोग्य विभाग गंभीर नाही.

जानेवारीपासून आतापर्यंत ग्रामीण भागात 25 हून अधिक डेंग्यूग्रस्त आढळले आहेत. त्यापैकी ऑगस्ट महिन्यात 49 जणांना तर सप्टेंबरच्या 18 दिवसांत 42 डेंग्युग्रस्त असल्याचे आढळून आले. मात्र महापालिकेचा आरोग्य विभाग ढिम्म आहे. कोणतीही उपाययोजना करीत नसल्याचे दिसून येत आहे.

स्वाइन फ्लू चाही धोका

स्वाइन फ्लूचा विळखाही कायम असताना आतापर्यंत 266 जणांना स्वाइनची लागण झाली आहे. त्यापैकी 8 मृत्यू शहरातील असल्याची माहिती आहे. याशिवाय स्क्रब टायफसचेही पाच रुग्ण आढळले असल्याचे निदानातून स्पष्ट झाले.
 

मागे

इलेक्ट्रॉनिक सिगरेटवरील बंदीच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
इलेक्ट्रॉनिक सिगरेटवरील बंदीच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

देशात आरोग्यासाठी प्राधान्य देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते....

अधिक वाचा

पुढे  

सावधान! अॅसिडिटीच्या ‘या’ औषधामुळे होईल कॅन्सर
सावधान! अॅसिडिटीच्या ‘या’ औषधामुळे होईल कॅन्सर

तुम्ही अॅसिडिटी झाल्यास कोणती गोळी घेता? प्रसिद्ध रेनिटिडाइन औषध तर घेत ना....

Read more