By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2020 08:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
निरोगी राहण्यासाठी शरीर आतून स्वच्छ आणि बळकट असणे गरजेचे आहे. मूत्रपिंडाने शरीर स्वच्छ राखण्यास मदत होते. मूत्रपिंडाची कार्यक्षमता उत्तम ठेवण्यासाठी वेळोवेळी डिटॉक्स करणं आपली जबाबदारी आहे. या लेखात आम्ही आपल्याला सांगणार आहोत हर्बल चहाबद्दल ज्याचा नियमित सेवनाने आपण आपल्या यकृत आणि मूत्रपिंडाला डिटॉक्स करू शकता.
मूत्रपिंड आणि यकृताला डिटॉक्स करण्यासाठी चहा :
जास्वंदाचा चहा आपल्या यकृताला निरोगी आणि सुरक्षित ठेवून अनावश्यक घटक बाहेर काढण्यास मदत करतं. याचे नियमाने सेवन केल्याने यकृताच्या आजारापासून दूर राहण्यास मदत होते.
दालचिनीचा चहा मूत्रपिंड आणि यकृताला स्वच्छ म्हणजेच डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. याने आपण आपल्या सकाळची सुरुवात करू शकतात.
बीटाचा चहा एक चांगला मूत्रपिंड क्लींजर आहे आणि हे आपल्या यकृताच्या आरोग्याला सुधारतो. बीटाचा रस अँटीऑक्सीडेंटने समृद्ध असतं. जे मुक्त रॅडिकल्स काढून टाकतो. हा मूतखडा सारख्या आजारावर फायदेशीर आहे.
औषधी गुणधर्माने समृद्ध असलेल्या हळदीचे सेवन केवळ मूत्रपिंडांना डिटॉक्स करण्यातच मदत करीत नाही तर या मुळे सूज येणं देखील कमी होते. हळद रक्तदाब कमी करते, जे मूत्रपिंडाच्या आजाराचे मुख्य कारण आहे. इतकेच नव्हे तर हे मूत्रपिंडाचे कार्य सुधारते. परंतु उन्हाळ्यात हळदीचा चहा शरीरात जास्त उष्णता वाढवू शकतो, म्हणून उन्हाळ्यात याचे सेवन न करणेच योग्य मानले जाते.
कोरोना व्हायरस किंवा विषाणू पूर्वी घशात आणि फुफ्फुसांमध्ये संसर्ग पसरवीत ....
अधिक वाचा