By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 27, 2019 02:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
माणसाला अनेक रोग हे विषाणूंमुळे होत असतात. हे विषाणू पकडून त्यांची ओळख पटवणारे एक हातात मावेल असे साधे उपकरण वैज्ञानिकांनी विकसित केले आहे. विषाणूतज्ज्ञांच्या मते प्राण्यांमध्ये एकूण १.६७ दशलक्ष विषाणू आहेत. त्यातील अनेक मानवात संक्रमित होतात. यात जे विषाणू सर्वांना परिचित आहेत त्यात H5N1, H1N1, झिका, इबोला यांचा समावेश होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते विषाणूचा प्रसार जेवढा जास्त लवकर ओळखता येईल तेवढे रोग आटोक्यात आणण्यासाठी उपयुक्त ठरते. कारण त्यामुळे उपाययोजना करण्यास वेळ मिळतो.
न्यूयॉर्क विद्यापीठ व पेन स्टेट विद्यापीठाने या बाबत संशोधन केले असून प्रा. मॉरिशियो टेरोन्स यांनी सांगितले की, हातात सहज बाळगता येईल असे उपकरण तयार केले असून त्याच्या मदतीने विषाणू पकडून त्यांची ओळख पटवता येते. या उपकरणात नॅनोटय़ूबचा वापर केला असून त्यात विविध विषाणूंच्या आकारानुसार वर्गवारी होते नंतर रोमन वर्णपंक्तीशास्त्राच्या मदतीने विषाणूंची ओळख पटवली जाते.
या उपकरणाचे नाव व्हिरियॉन असे आहे. त्याचे अनेक उपयोग आहेत. पिकांनाही विषाणूंची बाधा होती ती ओळखण्यासाठी त्याचा वापर शक्य आहे. त्यामुळे पिकांची हानी टळणार आहे. सध्याच्या पद्धतीत विषाणू ओळखण्यास अनेक दिवस लागतात. नवीन उपकरणाने ते काही मिनिटांत ओळखता येतील.
या उपकरणाचा आकार व कमी किंमत यामुळे ते प्रत्येक डॉक्टरला वापरता येईल. अगदी दूरस्थ ठिकाणी विषाणूची साथ आली तरी त्याचा अभ्यास करता येईल. व्हिरियॉन यंत्र काही सेंटीमीटरचे आहे त्यात सोन्याचे नॅनोकण वापरले आहेत त्यामुळे विषाणूचे रेणू अगदी कमी संख्येतीत असले तरी ओळखता येतात. यातून विषाणूंचा संचही तयार करता येऊ शकतो.
आजच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात अनेक जण 'ब्रेकफास्ट'ला (नाश्ता) ....
अधिक वाचा