By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 14, 2019 12:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
मुंबई – आपल्या देशात दिवसागणिक मधुमेहींची संख्या वाढतच आहे. दरवर्षी १० लाखाहून अधिक लोक मृत्यूमुखी पडतात. बदललेल्या जीवनशैली मुळेच मधुमेहींची संख्या वाढवत असल्याने सांगण्यात येते. आज जागतिक मधुमेह दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून आतापासूनच मधुमेह कसं टाळता येईल, हे पाहिले पाहिजे.
आपल्या देशात दर १२ व्यक्तिमागे एक जण मधुमेहाचा रुग्ण आहे. सध्या चीन नंतर मधुमेहाच्या रुग्णात भारताचा दूसरा क्रमांक लागतो. मधुमेहामुळे हृदयरोग किडणीचा आजार, तसेच डोळ्यांचाही समस्या निर्माण होतात. इंटरनॅशनल डायबीटीज फेडरेशनच्या २०१७ च्या अहवालानुसार जगभरात मधुमेहाचे ७ कोटीहून अधिक रुग्ण आहेत. २०३४ पर्यंत जगात १३ कोटीहून अधिक रुग्ण असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रुग्णांनी आपली मधुमेहाची पातळी १ टक्क्यानेही कमी केली तरीही मधुमेह नियंत्रणात राहू शकतो. त्यामुळे पॅरालिसिसचा धोका १२ टक्के कमी होऊ शकतो. तर हार्टअटॅकचा धोका १४ टक्के कमी होऊ शकतो. किडणीचे आजार ३३ टक्के व अवयव कापण्याच्या शक्यतेत ४३ टक्के घट होऊ शकते. एचबीए १ सी चा स्तर ५ टक्क्यांनी खाली असल्यास व्यक्तींची प्रकृती उत्तम मानली जाते. एचबीए १ सी एक ब्लड स्टेट आहे. त्याची दर ३ महिन्यांनी टेस्ट करावी. आरोग्य उत्तम राखण्यासाठी सर्वांनी मधुमेहाची चाचणीकरून घेणे आवश्यक आहे.
आज १४ नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन आहे. भारतात ६ कोटींहून अधिक रूग्ण डायबेटी....
अधिक वाचा