By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 07, 2019 02:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
एका निरोगी मनुष्यासाठी झोप अत्यंत आवश्यक आहे. मेडिकल सायन्सनुसार रात्री कमीत कमी 6 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे. यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या होत नाहीत आणि दिवसही चांगला जातो. विज्ञानानुसार दिवसा झोपण्याचे टाळावे, कारण असे केल्याने विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आपल्या धर्म ग्रंथामध्येही दिवसा झोपणे वर्ज्य सांगण्यात आले आहे. दिवास्वापं च वर्जयेत्. येथे जाणून घ्या, दिवसा झोपल्यामुळे कोणते नुकसान होऊ शकते...
दिवसा झोपल्याने होणारे नुकसान...
- सामान्यतः असे दिसून येते की, बहुतांश घरगुती महिला तसेच दोन शिफ्टमध्ये काम करणारे पुरुष दिवस झोपतात. असे केल्याने आपण आजारांना आमंत्रण देतो.
- दिवसा झोपणे फक्त शास्त्रामध्ये वर्ज्य सांगण्यात आलेले नाही तर आयुर्वेदानुसारही दिवसा झोपल्याने वेगवेगळे रोग होण्याची शक्यता वाढते.
- आयुर्वेदानुसार, दिवसा झोपल्याने सर्दी-पडसे होऊ शकते. ही सर्दी जास्त राहिल्यास नंतर कफ होतो. कफ रोगच पुढे चालून श्वसनाचा आजार बनतो.
- श्वसनाचा आजार असलेल्या रुग्णाचे हळू-हळू फुप्फुस खराब होते आणि ही स्थिती क्षय रोगामध्ये बदलू शकते.
- वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही रात्री पूर्ण झोप घेऊन दिवसा काम करणे उत्तम मानले गेले आहे. - रात्रीच्या झोपेमुळे शरीराला पर्याप्त आराम मिळतो, ज्यामुळे सकाळी उठल्यानंतर शरीरात नवीन ऊर्जेचा संचार राहतो. यामुळे दिवसभर कामातही उत्साह राहतो. - दिवसा झोपल्यामुळे आपला आळस वाढतो. यामुळे रात्री पूर्ण झोप घ्यावी आणि सकाळी लवकर उठावे.
सकाळी लवकर उठण्याचे फायदे
वैज्ञानिक संशोधनानुसार सकाळीच्या वेळेत ऑक्सिजन 41 टक्के, जवळपास 55 टक्के नायट्रोजन आणि 4 टक्के कार्बनडायऑक्साइड वायू राहतो. सूर्योदयानंतर वायुमंडळामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी तर कार्बनडायऑक्साइडचे वाढते. ऑक्सिजन आपल्या जीवनाचा आधार आहे. शास्त्रामध्ये याला प्राणवायू म्हटले जाते. जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्यास आपले शरीर स्वस्थ राहते. यामुळे सकाळी लवकर उठावे.
फळे किंवा सलाड खाणे चांगली सवय असली तरी अनेकदा लोकांना हे पदार्थ खाल्ल्यान....
अधिक वाचा