ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोना व्हायरसपासून दूर राहण्यासाठी या १० गोष्टी करा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 16, 2020 12:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोना व्हायरसपासून दूर राहण्यासाठी या १० गोष्टी करा

शहर : मुंबई

कोरोना व्हायरसच्या प्रभाव वाढत आहे. देशात आणि राज्यात रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. जगभरात आतापर्यंत ६ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात देखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १०० च्या वर पोहोचली आहे. ज्यापैकी २ जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतात हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरू शकतो. त्यामुळे विशेष काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी काही गोष्टी कटाक्षपणे करण्याची गरज आहे.

1 कोरोना पासून वाचण्यासाठी स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कोणत्याही वस्तूला हात लावल्यानंतर 20 सेकंड हात व्यवस्थित धुवून घ्या.

2. कोरोना झालेल्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचं टाळा. ताप, खोकला असलेल्या व्यक्तीपासून २ हात लांबच राहा.

3. डोळे, नाक, तोंडाला पुन्हा पुन्हा हात लावू नका. साबन किंवा सेनिटायजरचा वापर करा.

4. फोन किंवा इतर ज्या वस्तू तुम्ही सारख्या सारख्या हाताळता त्याच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या.

5. खोकला आणि शिंका आल्यावर रुमाल आणि टिशू पेपरचा वापर करा. टिशू पेपर कोठेही टाकू नका. त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावा. रुमाल देखील स्वच्छ करुन वापरा.

6. ताप, कफ आणि श्वास घेताना जर त्रास होत असेल तर डॉक्टांरांकडून उपचार घ्या. कोरोनाच्या रुग्णाच्या संपर्कात आले असाल तर लगेचच दवाखान्यात उपचार घ्या.

7. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे. शक्य असल्यास घरातच कामं करावे.

8. जर तुम्हाला कोरोनाचे लक्षण दिसत असतील तर लगेचच टेस्ट करण्यासाठी जावे. पण त्याआधी कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये.

9. खूप पाणी पिणं आवश्यक आहे. लोकांना हात मिळवू नका. कोणत्याही वस्तूला हात लावल्यानंतर लगेचच हात धुवून घ्या.

10. खोकला येत असेल तर विशेष काळजी घ्या. तोंडावर रुमाल घ्या. बाहेर गर्दीत असताना नाकावर मास्क किंवा रुमाल लावा.

मागे

कोरोना व्हायरसबद्दल 10 खोट्या गोष्टी, ज्या आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे
कोरोना व्हायरसबद्दल 10 खोट्या गोष्टी, ज्या आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे

जगभरात 100 हून अधिक देशांमध्ये कोरोना व्हायरस पाय पसरून चुकला आहे. भारतात देख....

अधिक वाचा

पुढे  

लिंबानेही रोखता येऊ शकतो कोरोनाचा प्रादुर्भाव
लिंबानेही रोखता येऊ शकतो कोरोनाचा प्रादुर्भाव

कोरोना व्हायरसला (Corona Virus) न घाबरता, त्याबाबत खबरदारी बाळगून योग्य ती काळजी घेण....

Read more