ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हिवाळ्यात चिकू खाल्ल्याने होतील हे खास फायदे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2020 01:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हिवाळ्यात चिकू खाल्ल्याने होतील हे खास फायदे

शहर : मुंबई

हिवाळ्यात चिकूचा आहारात समावेश करणे अधिक फायदेशीर ठरते. कारण चिकू खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते. तसेच इम्युनिटी सिस्टिमही चांगले होते. त्यासोबतच चिक्कूमध्ये व्हिटॅमिन सी आढळते जे बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करते.

कफ बाहेर पडतो -: थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त लोकांना सर्दीच्या समस्या उद्भवतात. अशावेळी चिक्कू खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. चिकू खाल्ल्याने छातीत अडकलेला कफ नाकावाटे बाहेर पडतो. याने तुम्हाला लगेच आराम मिळतो. अनेकांचा असा समज असतो की, हे फळ थंड असल्याने याने सर्दी वाढते, पण हा समज चुकीचा आहे. या फळामुळे सर्दी बरी होते.

पोटाचे आजार दूर होतात -: चिकूमध्ये टॅनिनचे प्रमाण अधिक असते. हे अॅंटि-इंफ्लामेटरी एजंटसारखे काम करते. ज्यामुळे पोटाशी संबंधित आणि आतड्यांशी निगडित समस्या दूर होते. त्यामुळे यापुढे कधी पोटाची समस्या झाली तर चिकू खायला विसरू नका.

औषधासाठी वापर होताे -: फायबर भरपूर प्रमाणात असलेल्या फळांनी पचनक्रिया चांगली होते. याने आतडेही चांगले राहते. चिकूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते, ज्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारची औषधे तयार करण्यासाठी केला जातो. तसेच चिकू खाल्ल्याने पोटाची समस्याही दूर होते.

केस मुलायम होतात -: चिकूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोषक तत्त्वे असतात. यामध्ये व्हिटॅमिन , व्हिटॅमिन आणि व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असतात. जर तुम्ही नियमित चिक्कू खाल्ले तर त्वचा हेल्दी आणि मॉइश्चराइज होईल. या फळामुळे त्वचेवरील सुरकुत्यांपासून बचाव होतो. त्यासोबतच केस देखील मुलायम होतात.

 

मागे

४४० जणांना कोरोना विषाणू संसर्ग; ९ बळी
४४० जणांना कोरोना विषाणू संसर्ग; ९ बळी

       बीजिंग - चीनमध्ये कोरोना विषाणूने आतापर्यंत मरण पावलेल्यांची सं....

अधिक वाचा

पुढे  

या उपायांमुळे दूर होऊ शकतात दातांचे आजार
या उपायांमुळे दूर होऊ शकतात दातांचे आजार

आईस्क्रीम खाताना दात ठणकतो आणि हात गालाकडे जातो. हे अनेकांनी अनुभवले असेल. त....

Read more