By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2019 05:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आपल्या आजूबाजूला बरेच असे लोक आहेत ज्यांना आपण स्वच्छतेच्या नावावर सॅनिटायझरचा वापर करताना पाहिले असेल. हे लोक कशालाही हात लावल्यावर हाताला संसर्ग होऊ नये म्हण्ून 'सॅनिटायझरचा' वापर करतात. हे एक असे लिक्विड आहे जे ९९.९ % जंतूंना संपवण्याचा दावा करते. जर तुम्हीसुद्धा सॅनिटायझरचा वापर अधिक करत असाल तर याच्या जास्त वापराने होणाऱ्या नुकसानीबद्दल जाणून घेऊया.
सॅनिटायझरमध्ये ट्रायक्लॉसान नावाचे रसायन असते जेे त्वचेवर पडताच कोरडे होते. हे जास्त वापरल्यामुळे त्वचेद्वारे ते रक्तात मिसळते. रक्तात मिसळल्यानंतर मांसपेशींचे नुकसान होते. यामुळे रोगप्रतिकारक क्रिया बिघडते व अॅलर्जीसुद्धा होऊ शकते.सॅनिटायझरमध्ये विषारी तत्त्व आणि बेंजाल्कोनियम क्लोराइड असते जे आपल्या त्वचेसाठी नुकसानदायक असते. यामुळे त्वचेमध्ये जळजळ आणि खाज येण्याची समस्या होते. सॅनिटायझरमध्ये सुगंध येण्यासाठी फॅथलेटस नावाचा केमिकल वापरले जाते. ज्या सॅनिटायझरमध्ये याचे प्रमाण जास्त असते ते हानिकारक असते.या प्रकारचे जास्त सुगंधयुक्त सॅनिटायझरमुळे यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस आणि प्रजनन तंत्राला नुकसान होते. सॅनिटायझरमध्ये असलेले alt147बिस्फेनॉल ए' एक असे रसायन आहे जे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे कारण होऊ शकते. यामध्ये असे रसायनदेखील असते ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.
शरीरावर दागिने घालण्याचा आपलं महत्त्व आहे सर्व दागिन्यांचे आपआपले फायदे आ....
अधिक वाचा