ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वारंवार ढेकर येणे...मूळ शोधा आणि उपचार घ्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 22, 2019 01:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वारंवार ढेकर येणे...मूळ शोधा आणि उपचार घ्या

शहर : मुंबई

जेवणानंतर लगेच कुणी ढेकर दिला की त्याचे पोट भरले असे मानले जाते. ढेकर म्हणजे पोटातील हवा बाहेर येण्याची प्रक्रिया. जेव्हा आपण काही खातो किंवा पितो तेव्हा तोंडावाटे काही प्रमाणात हवा आपल्या पोटात जाते आणि ही हवा तोंडावाटे पुन्हा बाहेर फेकली जाते आणि त्याला ढेकर असे म्हटले जाते.

जेवणानंतर ढेकर आला की, पोट थोडे हलके झाल्यासारखे वाटते, एक प्रकारे समाधान मिळते. मात्र अनेकदा आपल्याला आंबट ढेकरदेखील येतात, ज्यामुळे आपल्याला त्रास होतो. अशा दोन्ही प्रकारच्या ढेकराबाबत आपण जाणून घेऊयात.

ढेकर प्रकारचे असतात, एक आंबट आणि एक साधा. जेव्हा आपण खाल्लेले अन्न अन्ननलिकेमार्फत पोटात सरकते तेव्हा तिथे असलेली हवा बाहेर पडते. जेवणानंतर लगेच ढेकर येणे ही पोट भरल्याची लक्षणे आहेत, असा ढेकर शक्यतो तासांत येतो, तर आंबट ढेकर हे अपचनाचे लक्षण आहे. तासांनंतर अन्नपचनाची सुरुवात झालेली असते, अशा वेळी अन्न नीट पचले नाही तर आंबट ढेकर येतो.

जनरल फिजिशियननुसार, आपल्या पोटात अन्न गेल्यानंतर चयापचय प्रक्रियेत काही घटक तयार होतात, त्या वेळी हवादेखील तयार होते आणि ही हवा तोंडावाटे बाहेर फेकली जाते. पचनानंतर आलेला ढेकर शुद्ध असतो, त्यात आंबटपणा नसतो. जर अन्न नीट पचले नाही तर आंबट ढेकर येतो. त्यात करपटपणा असतो. या वेळी छातीत जळजळ जाणवते.

आपल्या काही सवयीदेखील ढेकर येण्यास कारणीभूत ठरतात -: भरभर खाणे, च्युइंगम चघळणे, धूम्रपान, सोडायुक्त पेयांचे सेवन, अनेकांना भरपूर वेळ ढेकर येतात. मात्र त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. जास्त ढेकर येणं ही एखादी समस्यादेखील असू शकते.

ढेकर कसा थांबवावा? -: काही खाताना सावकाश खा, सोडा आणि बिअर पिऊ नका, च्युइंगम चघळू नका, धूम्रपान थांबवा, जेवणानंतर थोडे चाला, जेणेकरून पचन होईल, तुमच्या सवयींमध्ये थोडेफार बदल केल्यास ढेकरचे प्रमाण कमी होईल. मात्र तरीदेखील डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

अॅसिड रिफ्लेक्स किंवा गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लेक्स डिसिज -: अपचन, गॅस्ट्रायटिस, हेलिकोबॅक्टर पायलोरी, इरिटेल बाऊल सिंड्रोम, एकदा, दोनदा ढेकर आली तर ठीक मात्र वारंवार ढेकर आल्यावर आपल्यालाही त्रास होतो, शिवाय आपण कोणासोबत असतो.

मागे

रेडनेस रॅशेजमधून समजते त्वचेची संवेदनशीलता
रेडनेस रॅशेजमधून समजते त्वचेची संवेदनशीलता

संवेदनशील त्वचेवर प्रत्येक ऋुतूचा परिणाम पटकन होतो. जर तुमची त्वचाही अशी अ....

अधिक वाचा

पुढे  

काशाच्या वाटीने पायाला मसाज करण्याचे फायदे
काशाच्या वाटीने पायाला मसाज करण्याचे फायदे

दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी घरी परतल्यानंतर अनेकांना थकवा जाणवतो. ....

Read more