By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 02, 2020 08:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मद्यपानाची सवय फारच वाईट असते. आजच्या काळात मद्यपान करणे जणू फॅशनच बनली आहे. अधून मधून केलेले मद्यपान आपल्या आरोग्यास हानी पोहोचवत नाही, पण जर आपल्याला मद्यपानाची सवय लागलेली आहे आणि आपण त्या शिवाय जगू शकत नाही असे असल्यास हे गंभीर धोक्याचे लक्षण असू शकतात. जास्त प्रमाणात मद्यपानाचे सेवन देखील आपल्याला पोकळ बनवतात. म्हणून वेळेवर सावधगिरी बाळगून या सवयी पासून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा.
* हळू-हळू प्रयत्न करावे-
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर एखाद्या माणसाला मद्यपानाची सवय लागलेली असल्यास तर ती सवय एकाएकी सुटणे तर अवघड आहे.असे शक्य नाही कारण त्यामुळे त्याच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. म्हणून ही सवय एकदम न सोडवता अशा माणसांना आधी मद्याचे प्रमाणं कमी करायला पाहिजे. जसे की 4 -5 पेग ऐवजी एकच घ्यावे. अशा प्रकारे दररोज मद्य न घेता आठवड्यातून काही दिवसच घ्यावे आणि त्याच प्रमाणे हळू-हळू एक दिवस घेणे. मग मद्यपानापासून दूर राहावे.
* इच्छाशक्ती या साठी औषध आहे -
जर आपल्याला असे वाटते की एखादे औषध घेतल्यानं आपली मद्यपानाची सवय सुटेल तर असे काही नाही. या साठी आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. ते आपल्याला सल्ला देखील देतील.जेणे करून आपली मद्यपानाची लागण कमी होईल. पण या व्यसनातून मुक्त होण्यासाठी आपल्याला आपली इच्छाशक्ती दृढ करण्याची आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असते.
* योजना आखावी -
तज्ज्ञांच्या मते, 'मला मद्यपान सोडवायचे आहे' असे म्हणून आपली मद्यपानाची सवय सुटणार नाही. या साठी आपल्याला एक योजना आखावी लागेल की आपल्याला मद्यपानाची इच्छा झाली असल्यास त्यावेळी आपल्याला काय करावयाचे आहे आणि आपल्या मनावर कसा ताबा ठेवायचा आहे किंवा आपण आपल्या मित्राशी बोलू शकता. अशा गोष्टी स्पष्ट झाल्यावर आयुष्य जगणं थोडं सोपं होईल.
* स्वतःची काळजी घ्या -
मद्यपानाचे व्यसनापासून मुक्त होणे फार सोपे नाही. या साठीचे प्रयत्न करताना आपण कधी आनंदी असाल तर कधी अस्वस्थ असाल. म्हणून पुढील परिस्थिती साठी स्वतःला मानसिकदृष्टया सज्ज ठेवा आणि मनाला शांत राखण्यासाठी काही काम करा जसे की वॉकला जाणे, ध्यान करणे किंवा झोपण्यापूर्वी दिवसभराच्या चांगल्या गोष्टींना आठवणे. या मुळे आपण सकारात्मक अनुभवाल.
* इतर गोष्टींवर लक्ष द्या -
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मद्यपानाची सवयी पासून मुक्त होण्यासाठी स्वतःला व्यस्त ठेवणे फार महत्त्वाचे आहे. या साठी आपण एखादा छंद वर्ग जसे की डान्स, संगीत, पेंटिंग देखील सुरू करू शकता. मद्यपान करण्याऐवजी आपण इतर काम देखील करू शकता. त्याची एक यादी तयार करा आणि त्यामधील काही निवडक काम करा.
* स्वतःला आठवण करत राहा -
तज्ज्ञांच्या मते मद्यपान प्रत्येकाच्या आरोग्यासाठी चांगले नाही, पण आपल्याला मद्यपान का सोडायचे आहे त्यासाठी एक यादी बनवा जसं की एक चांगले पालक बनण्यासाठी किंवा एक मदतगार जोडीदार बनण्यासाठी किंवा नोकरीत आपली कामगिरी सुधारण्यासाठी. हेतू कोणतेही असो दररोज स्वतःला या गोष्टींची आठवण देत राहा, जेणे करून आपण मद्यपान सोडण्यासाठी प्रेरित व्हाल.
* हार मानू नका -
मद्यपानाची जुनी सवय इतक्या लवकर बदलत नाही. म्हणून ही सवय बदलण्यासाठीची कोणती ही युक्ती कामी न आल्यामुळे एखाद्या दुसऱ्या युक्तीला अवलंबवा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या, पण हार मानू नका.
मद्यपानामुळे आरोग्याचे नुकसान होते - तज्ज्ञांच्या मते, मद्यपानाचे अधिक सेवन केल्यानं आरोग्यास हानी होऊ शकते.
* शारीरिक आणि मानसिक आजार होऊ शकतात. या मुळे मज्जासंस्था, लिव्हर आणि पोटाच्या आजारांचा धोका वाढू शकतो.
* हृदय विकारांची शक्यता वाढते.
* आरोग्यासह कुटुंबातील आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या लोकांशी संबंध बिघडतात, कारण नशा करताना एखादी व्यक्ती काय बोलते ते त्याला स्वतःलाच कळत नाही.
मद्यामध्ये इथाईल अल्कोहोल वापरले जाते. हे मानवी रक्तात सहज विरघळते. याच कारणास्तव दीर्घकाळापर्यंत मद्यपानाचे सेवन केल्याने शरीराच्या जवळ-जवळ सर्व अवयवांवर परिणाम होतो. वारंवार सेवन केल्याने लिव्हर सिरोसिस होऊ शकते. इथाईल अल्कोहोल मुळे पचन संस्था देखील खराब होऊ शकते.
सायनसच्या त्रासाची सुरुवात ऍलर्जी आणि सर्दी पडस्यापासून होते. दिवसात उकाड....
अधिक वाचा