ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डोकेदुखीपासून लगेचच आराम देण्यासाठी……

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 31, 2019 09:43 AM 2019-02-12T14:15:30+5:30

डोकेदुखीपासून लगेचच आराम देण्यासाठी……

शहर : मुंबई

डोके दुखी हे एक कॉमन प्रॉब्लम आहे. याचे बरेच कारणं असू शकतात, जसे डोळ्यांची समस्या, अपच, ऊन लागणे, अनियमित मासिक धर्म, सायनास, ताप, रजोनिवृत्ती, निरंतर चिंता, मानसिक तणाव, उशीरा रात्रीपर्यंत जागणे, अनिद्रा, दुखी राहणे, कडक उन्हात फिरणे थकवा, दारू आणि इतर मादक पदार्थांचे सेवन इत्यादी. अशात जास्त पेन किलरचे सेवन केल्याने रिऍक्शनची भिती सदैव राहते. म्हणून जर तुम्ही डोकेदुखीने परेशान असाल तर आम्ही तुम्हाला देत आहे डोकेदुखीपासून लगेचच आराम देण्यासाठी काही घरगुती उपाय ...

1.लवंगांत थोडे मीठ मिसळून त्याची पावडर तयार करून घ्यावे. या पावडरला एका बरणीत भरून ठेवावे, जेव्हा कधी डोकं दुखायला लागेल तर या पावडरमध्ये कच्चं दूध घालून पेस्ट तयार करून ती पेस्ट डोक्यावर लावावी. लगेचच डोके दुखीत आराम मिळतो.

2. एका ग्लासमध्ये गरम पाण्यात लिंबाचा रस घालून प्यायला पाहिजे. जर गॅसमुळे डोकं दुखत असेल तर लगेचच आराम मिळेल.

3. युकेलिप्टसच्या तेलाने डोक्याची मॉलिश करायला पाहिजे. याने डोकेदुखीत आराम मिळण्यास मदत होते.

4. जर तुम्ही वारंवार होणार्या डोकेदुखीमुळे परेशान असाल तर रोज एक ग्लास गायीच्या दुधाचे सेवन केले पाहिजे. आराम मिळेल.

5. कलमी (दालचिनी)ची पूड तयार करून ठेवावी. जेव्हा डोकं दुखण्यास सुरू होईल तेव्हा कलमीच्या पावडरला पाण्यात मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी. या पेस्टला डोक्यावर लावावे, नक्कीच आराम मिळेल.

6. सर्दीमुळे होणार्या डोकेदुखीत धणेपूड आणि साखरेचा घोळ तयार करून त्याचे सेवन केल्याने फायदा होतो.

7. गर्मीमुळे डोकं दुखत असेल तर चंदन पाउडरचे पेस्ट तयार करून कपाळावर लावल्याने डोकेदुखी दूर होईल.

8. नारळाच्या तेलाने 10-15 मिनिट डोक्यावर मसाज केल्याने देखील डोकं दुखीत आराम मिळतो.

9. लसणाची एका कळीचा रस बनवून प्यायल्याने देखील डोकेदुखीवर आराम मिळतो.

10. नेहमी डोकं दुखत असेल तर सफरचंदावर मीठ लावून खायला पाहिजे. त्यानंतर गरम पाणी किंवा दुधाचे सेवन केले पाहिजे. जर तुम्ही हा प्रयोग लागोपाठ 10 दिवसापर्यंत कराल तर डोकेदुखीची समस्या दूर होईल.

 

मागे

जास्त मिठाचे सेवन केल्यानं ........
जास्त मिठाचे सेवन केल्यानं ........

ब्रिघम आणि महिला अस्पताल द्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या शोधात असा खुलासा ....

अधिक वाचा

पुढे  

दररोज जेवणात टाका चिमूटभर हिंग, कधी होणार नाही हे  आजार....
दररोज जेवणात टाका चिमूटभर हिंग, कधी होणार नाही हे आजार....

भारतीय जेवणात स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी हिंगाची फोडणी दिले जाते. हिंगाच....

Read more