ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हिवाळ्यात उटणे हे फायदेशीरच

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 09, 2019 05:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हिवाळ्यात उटणे हे फायदेशीरच

शहर : मुंबई

दिवाळीच्या गुलाबी थंडीत पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची मजा काही औरच असते. आधी तेलाने मसाज आणि नंतर उटण्याने अंघोळ. अभ्यंगस्नान आपण फक्त दिवाळीतच करतो, पण पूर्ण हिवाळाभर रोज अभ्यंगस्नान केलं तर त्याचा खूप फायदा होतो. उटणं हे एक उत्तम प्रकारचे स्क्रबर आहे. बाजारातून विकतची स्क्रबर्स आणून ती लावण्यापेक्षा उटणं वापरणे केव्हाही चांगलेच...

उटण्याचे आरोग्यदायी फायदे

1. स्वच्छ त्वचा -: उटण्यामधील आयुर्वेदिक घटकांमुळे संसर्ग कमी होते. परिणामी ॅक्ने, पिगमेंटेशन, स्कार्स कमी होते. सूर्यप्रकाशामुळे झालेले त्वचेचे नुकसान टाळण्यास मदत होते. लिंबामध्ये ब्लिचिंग घटक असल्याने त्याचे काही थेंब मिसळणे फायदेशीर ठरते. आठवड्यातून एकदा उटण्याचा वापर केल्याने त्वचा निरोगी राहते. मात्र त्यानंतर लगेचच सूर्यप्रकाशात जाणे टाळा. जायचे झाल्यास सनस्क्रीनचा वापर आवर्जुन करावा.

2. चमकदार चेहरा -: उटणं हे एका स्क्रबरप्रमाणे काम करत असल्याने टॅनमुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास आणि त्वचेवर साचलेला डेड स्किनचा स्तर कमी करण्यास मदत करते. परिणामी त्वचेचा पोत सुधारतो. चंदनामुळे त्वचेत थंडावा राहण्यास मदत होते, तर यामध्ये दूध मिसळल्यास त्वचेला कांती मिळते.

3. चेहऱ्यावरील केसांची वाढ रोखते -: चेहऱ्यावरील केसांची वाढ कमी करण्यासाठी अनेक स्त्रिया उटण्याची निवड करतात. उटण्याची पेस्ट चेहऱ्यावर गोलाकार दिशेने फिरवल्यास मुळापासून त्याची वाढ रोखण्यास मदत होते. महिनाभर हा प्रयोग केल्यास त्याचे निकाल अधिक स्पष्टपणे दिसून येतात. पण उटण्याने मसाज करताना त्वचेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. त्वचेचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी भिजवलेली मसूर डाळ, सुकवलेल्या संत्र्याच्या सालीची पेस्ट आणि उटणं याचे एकत्र मिश्रण बनवून त्याचा हलका मसाज चेहऱ्यावर करावा.

4. त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात -: त्वचेवर सुरकुत्या पाहणे कोणाला आवडते ? पण वयानुसार त्यांचे येणे साहजिकच आहे. उटणं लावल्याने ही समस्या कमी करण्यास मदत होते. हळदीमध्ये ॅन्टी एजिंग, ॅन्टी ऑक्सिडेंंटिव्ह आणि दाहशामक क्षमता असते. यामुळे सुरकुत्या कमी करण्यास मदत होते. यामध्ये मध मिसळल्यास त्वचा मुलायम राहते आणि नेहमीसाठी आरोग्यदायीही राहते.

मागे

आहारातील कडधान्य आहेत आरोग्यासाठी उत्तम...
आहारातील कडधान्य आहेत आरोग्यासाठी उत्तम...

कडधान्य आपल्या आहारात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र आजच्या धकाधकीच्या ....

अधिक वाचा

पुढे  

अवलंबा पाणी पिण्याचे 5 नियम
अवलंबा पाणी पिण्याचे 5 नियम

जेवणानंतर पाणी पिऊ नका. जेवण करण्याच्या एक तास आधी पाणी प्यावे 1. सकाळी उठता....

Read more