By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2019 02:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
वय वाढू लागले तसा सांधे दुखण्याचा त्रास अनेकांना होतो, म्हातारपणी चालताना किंवा फिरताना गुडघ्यात वेदना होतात, असे म्हटले जाते. पण तरुणपणी शरीराकडे लक्ष दिल्यास, नियमित व्यायाम केल्यास आपण वृद्धावस्थेतही निरोगी आयुष्य जगू शकतो.
नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅटिस्टिक्सच्या अहवालानुसार, हाडे किंवा सांधेदुखीचा आजार केवळ वृद्धांमध्येच आढळतो, असे नाही. सध्या ३० ते ४० टक्के तरुणांमध्ये धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन, स्थूलपणा, जंक फूड्स आणि आरामदायी जीवनैशीलमुळे हाडांचे आजार वाढत आहेत. गुडघे, सांधेदुखीला वैद्यकीय भाषेत ऑस्टियो आर्थरायटिस असे म्हणतात.
नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहाराच्या मदतीने आपण हे आजार दूर ठेवू शकतो. बाल्टीमोर येथील युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनचे प्रोफेसर डॉ. दत्ता के यांच्या मते, म्हातारपण म्हटल्यावर आपण सांधेदुखी, अशक्तपणा येतोच, असे आपण म्हणतो. पण खरे तर ही आपल्या निष्क्रियतेची लक्षणे आहेत. याचा वयाशी संबंध नाही. सांध्यांच्या आजारासाठी आपण स्वत: जबाबदार असतो. खूप वेळ आरामखुर्चीवर बसणे, अधिक चरबीयुक्त अन्न सेवन करणे, वाढते वजन हे सर्व आजारांसाठी कारणीभूत असतात. पण आपण मात्र वय वाढत असल्यामुळे हे सर्व येतेच, हा विचार या आजारांसाठी प्रमुख कारण ठरतो. गुडघ्यांच्या आजारांसाठी एरोबिक्स करावे. ऑफिसमध्ये मान, गुडघ्यांचे स्ट्रेचिंग करत रहावे.
असे मानले जाते की, हृदय निकामी झाल्यावर हृदय काम करणे बंद करते. मात्र, हे पूर्....
अधिक वाचा